शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

१२ वाजेपर्यंत कळणार निकाल; आठ वाजेपासून सुरू होणार मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 12:58 IST

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरूवारी (दि.२४) सकाळी आठ वाजेपासून संबंधित मतदारसंघात सुरू होणार आहे. प्रशासनाने मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण केली असून साधारण बारा वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्यात मतमोजणीच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरूवारी (दि.२४) सकाळी आठ वाजेपासून संबंधित मतदारसंघात सुरू होणार आहे. प्रशासनाने मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण केली असून साधारण बारा वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्यात मतमोजणीच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विधानसभेच्या १२ मतदारसंघात सोमवारी ६९.४३ टक्के मतदान झाले. एकूण १२ जागांसाठी ११६ उमेदवारांचे भवितव्य यंत्रबंद झाले असून गुरूवारी त्यांचा फैसला होणार आहे. मतदानानंतर दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर प्रशासकीय अधिकारी-कर्मचा-यांनी मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. प्रशिक्षित कर्मचा-यांना मतमोजणीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले. मतदानानंतर मतदारसंघातील मतदान यंत्र संबंधित तालुक्यातील स्ट्राँगरूममध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. स्ट्राँगरूम शेजारील गोदामातच मतमोजणीची तयारी करण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी प्रक्रियेसाठी २० पर्यवेक्षक, २० सहायक, २० सुक्ष्म निरीक्षक असे एकूण ६० अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वात कमी २० फे-या कोपरगाव, नेवासा, संगमनेर, शिर्डी या मतदारसंघात असल्याने सर्वात आधी येथील निकाल येण्याची शक्यता आहे. पारनेर, शेवगाव, कर्जत-जामखेड अशी होईल मतमोजणीसर्वप्रथम टपाली व सैनिकी मतपत्रिकांची मोजणी. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी. एका फेरीत १४ टेबलवर १४ मतदान यंत्रांतील मते मोजणार. मतदान केंद्रांच्या संख्येनुसार फे-यांची संख्या. पहिल्या फेरीचा निकाल ९ वाजता येण्याची शक्यता. त्यानंतरच्या फे-यांचा निकाल २० ते २५ मिनिटांत येईल. दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येणार. २६ ते २७ फे-या असल्याने येथील निकाल शेवटी येण्याची शक्यता आहे.     मतमोजणीचे ठिकाणअकोले -पॉलिटेक्निक वर्कशॉप व कन्या विद्या मंदिर, संगमनेर -सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल. शिर्डी -तालुका मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय. कोपरगाव-सेवानिकेतन कॉन्वेंट स्कूल. श्रीरामपूर -प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय. नेवासा-नवीन शासकीय धान्य गोडावून, सेंट मेरी स्कूल रोड. शेवगाव-तहसील कार्यालय. राहुरी-लोकनेते रामदास धुमाळ महाविद्यालय. पारनेर-न्यू आर्टस कॉलेज. अहमदनगर-वखार महामंडळ, नागापूर, एमआयडीसी. श्रीगोंदा-शासकीय धान्य गोडावून, पेडगाव रोड. कर्जत-जामखेड-तहसील कार्यालय.

टॅग्स :Electionनिवडणूक 2024Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019