चावडा म्हणाले, कोपरगाव ग्रामीण उपविभागातंर्गत असलेल्या धारणगावातील ग्राहकांच्या ७ चुकीच्या वीजबिलांची दुरुस्ती करण्यात आली. तसेच गावातील १८ वाकलेले विजेचे खांब सरळ करून ४२ गाळ्यातील वीजतारा ओढण्यात आल्या. दोन ग्राहकांची खराब झालेली सर्विस वायर बदलून देण्यात आल्या, गावातील खराब झालेल्या दोन रोहीत्राचा बॉक्स बदलण्यात आला, तसेच काही ठिकाणी ८ नवीन खांबांची उभारणी करण्यात आली. वीज तारांच्या लगत असेलेल्या झाडणाच्या फांद्या तोडण्यात आल्या. तसेच नवीन वीज जोड मागणी संदर्भातील कागदपत्रे स्वीकारण्यात आली.
हा उपक्रम अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गोसावी यांच्या आदेशानुसार उपकार्यकारी अभियंता दिनेश चावडा यांच्या अध्यक्षतेखाली रवंदा वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता एन. आर. निकम मार्गदर्शनाखाली डी. जी. सावदेकर, व्ही. टी. लोखंडे, एस. के. घुमरे तसेच आर. बी. काकड, एम. आर. घोलप, जे. जी. बोरसे, व सहाय्यक लेखापाल एस. ए. ढाकणे यांनी सहभाग नोंदवला आहे.