शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

घोडेगावात विक्रमी कांदा आवक, साडेचार हजार भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 22:16 IST

घोडेगाव : नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील उपबाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक झाली. तब्बल ६१ हजार ४९८ गोणी कांद्याची आवक झाली. कांदा घेऊन येणाºया वाहनांची एक किमीपर्यंत रांग लागली होती. येथील एक नंबरच्या कांद्याला साडेचार हजार प्रतिक्विंटल भाव मिळाला.

घोडेगाव : नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील उपबाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक झाली. तब्बल ६१ हजार ४९८ गोणी कांद्याची आवक झाली. कांदा घेऊन येणाºया वाहनांची एक किमीपर्यंत रांग लागली होती. येथील एक नंबरच्या कांद्याला साडेचार हजार प्रतिक्विंटल भाव मिळाला.

मंंगळवार सकाळपासूनच घोडेगाव बाजारात छोटी-मोठी वाहने कांदा घेऊन येत होती. रात्री उशिरापर्यंत आवक सुरू होती. अचानक कांदा घेऊन येणाºया वाहनांची संख्या वाढल्याने बाजार समितीबाहेर एक किमीपर्यंत रांग लागली होती. त्यामुळे बाजार समिती प्रशासन, पोलिसांची धांदल उडाली होती. लिलावाच्या दिवशी बुधवारी सकाळीही कांदा घेऊन येणाºया वाहनांची गर्दी होती. सकाळी साडेसातलाच नगर-औरंगाबाद रस्त्यावर कांदा गोणी घेऊन आलेल्या वाहनांची अर्धा किमी रांग लागली होती. 

सकाळी साडेअकराच्या सुमारास सुरू झालेला लिलाव रात्री साडेसात ते आठपर्यंत सुरू होता. एक नंबर कांद्याला चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रूपये, दोन नंबर कांद्याला दोन हजार ते साडेतीन हजार रूपये, तीन नंबरला पाचशे ते एक हजार नऊशे रूपये भाव मिळाला.  बाजार आवारात राडारोडा...बाजार समितीमध्ये पावसाने दलदल निर्माण झाली. त्यामुळे कांदा केवळ शेडमध्येच उतरवून घ्यावा लागत होता. पावसाचा भरवसा नसल्याने बाहेर माल उतरवणे आडत्यांनी टाळले. म्हशीच्या बाजारात दोन्ही बाजूस आडत्यांनी दोन्ही बाजूला शेड बनविले आहेत. तेथे वाहनांना जाण्यासाठी रस्ते व्यवस्थित नाहीत. तेथे पाण्याचे डबके, चिखल, गाळ आहे. त्यामुळे वाहन चालकांची कसरत झाली. अखेर गोंधळ उडाल्याने बाजार समितीने ध्वनीक्षेपक लावून शेतकरी ,व्यापारी, आडते, वाहनचालकांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरonionकांदा