शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये चर्चेत राहिलेले राठोड यांची अमरावतीत नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 17:02 IST

नगरमध्ये विविध कारणांमुळे चर्चेत राहिलेले तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांना शासनाने अमरावती येथे नागरी हक्क संरक्षणचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती दिली आहे.

अहमदनगर : नगरमध्ये विविध कारणांमुळे चर्चेत राहिलेले तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांना शासनाने अमरावती येथे नागरी हक्क संरक्षणचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती दिली आहे.

    राठोड यांची नांदेड येथून बदली झाल्यानंतर त्यांनी ५ ऑक्टोबर रोजी नगर येथे पदभार स्वीकारला होता. त्यांनी स्वतंत्र पथक स्थापन करून जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध धंद्यावंर छापासत्र सुरू केले होते. त्यांच्या पथकाने नगर शहरात बनावट डिझेलवर केलेली कारवाई चांगलीच चर्चेचा विषय ठरली होती. ही कारवाई करणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे.

   दरम्यान राठोड हे एका कॉस्टेबलसोबत आर्थिक व्यवहाराबाबत चर्चा करत असल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ही क्लिपही चांगलाच चर्चेचा विषय ठरली. याच दरम्यान राठोड यांची शासनाने नगरमधून तडकाफडकी बदली केली. बदलीनंतर राठोड यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांनी मॅटमध्ये तक्रार केली होती. मॅटच्या आदेशानुसार शासनाने त्यांना नियुक्ती दिली आहे. दरम्यान राठोड यांच्या व्हायरल क्लिपची जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या माध्यमातून चाैकशी सुरू आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिस