लोणी : ‘तुमची हरवलेली नात तुमच्याकडे आणून देतो, असे म्हणून २० हजार रुपये नेल्यानंतर पुन्हा ७० हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी लोणी पोलिसांनी दोन आरोपींविरुध्द गुरूवारी खंडणीचा गुन्हा दाखल केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी बाळासाहेब रघुनाथ शिंदे (रा.शिंदे वस्ती मांडवे,ता.श्रीरामपूर) यांची नात राहत्या घरा समोरुन गायब झाली आहे. याबाबत शिंदे यांनी लोणी पोलीस ठाण्यात नात हरवल्याची तक्रार दाखल केलेली आहे. आरोपी शाम जाधव (रा.संक्रापूर, ता.राहुरी) व राहुल बनसोडे यांनी संगनमत करुन फिर्यादी शिंदे यांची भेट घेऊन, तुमची नात तुमच्यासमोर आणून देतो, असे म्हणून २० हजार रुपये रोख घेतले. त्यानंतर आरोपींनी शिंदे यांच्याकडे पुन्हा ७० हजार रुपयांची मागणी केली. त्यांची मागणी पूर्ण करु शकत नाही, तसेच पैशासाठी मुलगीही देत नाहीत म्हणून शिंदे यांनी जाधव व बनसोडे यांच्या विरोधात लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी शाम जाधव व राहुल बनसोडे यांच्याविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. पोलीस बेपत्ता मुलीचा शोध घेत आहेत. याप्रकरणी कोणालाही ताब्यात घेतले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बेपत्ता नातीच्या शोधासाठी खंडणी मागितली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 21:22 IST
लोणी : ‘तुमची हरवलेली नात तुमच्याकडे आणून देतो, असे म्हणून २० हजार रुपये नेल्यानंतर पुन्हा ७० हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी लोणी पोलिसांनी दोन आरोपींविरुध्द गुरूवारी खंडणीचा गुन्हा दाखल केला.
बेपत्ता नातीच्या शोधासाठी खंडणी मागितली
ठळक मुद्देआजोबांची फिर्यादलोणीत दोघांविरूद्ध खंडणीचा गुन्हा