शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राळेगणमध्ये सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना गावबंदी; तरुणांचा आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 13:17 IST

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्या मोदी सरकार गंभीरपणे घेत नसल्याच्या निषेधार्थ राळेगणसिद्धी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, उद्यापासून सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना गावबंदी करण्यात येणार असून, गावातील तरुणांना आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.

राळेगणसिद्धी : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्या मोदी सरकार गंभीरपणे घेत नसल्याच्या निषेधार्थ राळेगणसिद्धी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, उद्यापासून सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना गावबंदी करण्यात येणार असून, गावातील तरुणांना आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मात्र, अद्याप अण्णांचे उपोषण सोडविण्यासाठी सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. त्यामुळे राळेगणसिद्धीत बुधवारी दुपारी साडेबारा वाजता सभा घेण्यात आली. या सभेत मोदी सरकारवर ग्रामस्थांनी तीव्र शब्दात टीका करीत उद्यापासून गावात कोणत्याच सरकारी यंत्रणेला प्रवेश द्यायचा नाही, असा ठराव घेण्यात आला. तसेच तरुणांनी आत्मदहनाचा निर्णय घेतला असून, गावात पोलिसांनाही येऊ देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. महिलांसह ग्रामस्थांनी जेलभरो आंदोलन करण्याचा निर्धार केला.

दरम्यान अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राळेगणसिद्धीचे उपसरपंच लाभेष औटी व त्यांचे सहकारी ज्ञानेश्वर हावळे, रमेश औटी, नंदकुमार मापारी, तुकाराम क्षीरसागर यांनी गेल्या काही दिवसांपासून उपोषण सुरु केले होते. ग्रामस्थांच्या आग्रहाखातर ते उपोषण आज मागे घेण्यात आले. लाभेष औटी यांनी आपल्या मातोश्री जनाबाई औटी व जेष्ठ महिला तोलाबाई पठारे यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडले. यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख निलेश लंके, पंचायत सभापती राहूल झावरे, उपसभापती दीपक पवार, दादासाहेब पठारे, माजी सरपंच जयसिंगराव मापारी, उपसरपंच लाभेश औटी, सोन्याबापू भापकर, रमेश औटी, विलास औटी, शंकर नगरे, मंगल मापारी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारेParnerपारनेर