शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

 राहुरी पोलिसांनी पकडल्या चोरीच्या १३ मोटारसायकली; सापळा लावून एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 16:58 IST

मोटारसायकल चोरून फिर्यादीकडे पैशाची मागणी करणाºया एका आरोपीस राहुरी पोलिसांनी  बुधवारी दुपारी सापळा रचून पकडले. त्याच्याकडून १३ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. ४ मोटारसायकली मुळा धरणात टाकून दिल्याची कबुली चोरट्याने राहुरी पोलिसांना दिली.

राहुरी : मोटारसायकल चोरून फिर्यादीकडे पैशाची मागणी करणाºया एका आरोपीस राहुरी पोलिसांनी  बुधवारी दुपारी सापळा रचून पकडले. त्याच्याकडून १३ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. ४ मोटारसायकली मुळा धरणात टाकून दिल्याची कबुली चोरट्याने राहुरी पोलिसांना दिली.पोलीस अधीक्षक सागर पाटील व पोलीस अधीक्षक डॉ़दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने  यांच्या सूचनेनुसार राहुरी पोलिसांनी ही कारवाई केली. राहुरी पोलिसांना मिळालेल्या गुप्त खब-यामार्फत राहुरी पोलिसांनी मोटारसायकलच्या मालकाशी संपर्क साधला. त्यानुसार पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी बुधवारी दुपारी बारागान नांदूर येथे सापळा लावला.  यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, सहायक पोलीस निरीक्षक यशवंत राक्षे, पोलीस उपअधीक्षक यशवंत राक्षे, उपनिरीक्षक गणेश शेळके,पो. हे. काँ. संजय पठारे, अमित राठोड, शिवाजी खरात, निलेश मेटकर, सचिन ताजणे, आजिनाथ पाखरे, प्रवीण अहिरे यांनी आरोपी आकाश आहेर याला सापळा लावून पकडले. आहेर याने त्याचे साथीदार गणेश शेटे, सनी बाचकर यांनी राहुरी परिसरातून १३ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल हे करीत आहेत. आरोपीस राहुरी न्यायालयासमोर हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे.मोटारसायकल मालकांकडून पैशांची वसुलीमुळा धरणात चोरलेल्या मोटारसायकली टाकल्या जातात अशी ओरड मोटारसायकल मालकांकडून करण्यात येत होती. चोरटे मोटारसायकल चोरल्यानंतर मालकास फोन करून मोटारसायकलच्या परिस्थितीनुसार रक्कम वसुल करीत असत. मुळा धरणात आणखी मोटारसायकली सापडतील का? यादृष्टीने तपास सुरू आहे. मोटारसायकली चोरांबद्दल कुणाला काही माहिती सांगायची असल्यास राहुरी पोलीस स्टेशनची संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी केले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीCrime Newsगुन्हेगारी