शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

राहुल गांधींचे विधान देशाला बदनाम करणारे: केंद्रीय मंत्री कराड यांची टीका

By अरुण वाघमोडे | Updated: March 26, 2023 16:46 IST

खासदार हे न्यायालयात दोषी आढळले तर त्यांना या पदावर राहता येणार नाही, असा निकला सुप्रीम कोर्टाने दिला होता

अहमदनगर: भारत देशाची जगात प्रथम क्रमांकाची लोकशाही आहे. राहुल गांधी यांनी मात्र इंग्लडमध्ये जाऊन भारतात लोकशाही नाही, असे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य देशाला बदनाम करणारे आहे. असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केले.

मंत्री कराड (दि.२६) यांनी रविवारी नगर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी म्हणाले भारतीय जनता पक्ष हा न्यायदेवतेला मानणारा आहे. राहुल गांधी यांच्याबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर संसद सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली. दरम्यान आमदार, खासदार हे न्यायालयात दोषी आढळले तर त्यांना या पदावर राहता येणार नाही, असा निकला सुप्रीम कोर्टाने दिला होता. या निर्णयाविरोधात तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने अध्यादेश आणला होता. त्यावेळी राहुल गांधी यांनीच या अध्यादेशाला विरोध दर्शविला होता.

आता त्याच नियमानुसार त्यांच्यावर कारवाई झाल्याचे मंत्री कराड यांनी सांगितले. केंदाचा यंदाचा ४५ लाख ३ हजार २७० कोटींचा अर्थसंकल्प आहे. २०१६ रोजी अर्थसंकल्प १६ लाख कोटींचा होता. गेल्या नऊ वर्षांत पावणेतीन पटीने यात वाढ झाली आहे. या अर्थसंकल्पात संरक्षण, ट्रान्सपोर्ट, रेल्वे यासह विविध घटकांसाठी मोठी तरतूद केलेली आहे. यातून देशासह महाराष्ट्रातील बहुतांशी रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. तसेच अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी भरीव मदत दिली जाणार आहे. असे ते म्हणाले.लोकसभेच्या ४८ तर विधानसभेच्या २००च्यावर जागा जिंकणार

भाजपाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) व आरपीआय अशा संयुक्त आघाडीने आम्ही लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका लढविणार आहोत. महाराष्ट्रात मागीलवेळी लोकसभेच्या आमच्या युतीने ४३ जागा जिंकल्या होत्या. आता लोकसभेच्या ४८ तर विधानसभेच्या २००च्यावर जागा जिंकण्याचे आमचे उदिष्ट आहे. राज्यात शिवसेनेशी जागावाटबाबत वरिष्ठ नेत्यांकडून निर्णय घेतला जाईल. असे मंत्री कराड यांनी सांगितले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBhagwat Karadडॉ. भागवत