शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

नगर जिल्ह्यातील अनुभवातून खूप शिकलो-राहुल व्दिवेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 11:10 IST

नगर जिल्हा ख-या अर्थाने माझा शिक्षक असून या शिक्षकाने शिकवलेला प्रत्येक धडा पुढील करिअरमध्ये कामी येणारा आहे, अशा शब्दांत जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी शिक्षक दिनानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या. 

चंद्रकांत शेळके अहमदनगर : प्रत्येकाच्या जीवनातील जडणघडणीत त्याच्या गुरूचे स्थान अढळ असते. त्यात शिक्षकांची भूमिका मोलाची ठरते. परंतु माझ्या जडणघडणीत विशिष्ट एका शिक्षकाचे नाव घेता येणार नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ज्यांनी मला मार्गदर्शन केले तो प्रत्येकजण माझा गुरू आहे. गेल्या दहा वर्षांत ठाणे, दिल्ली, गोंदिया, भंडारा, वाशिम येथे सनदी अधिकारी म्हणून काम केले. परंतु नगर जिल्ह्यातील काम खूप आव्हानात्मक होते. राजकीय, सामाजिक, शासकीय अशा सर्वच बाबतीत काम करताना नगरमधून खूप शिकायला मिळाले. नगर जिल्हा ख-या अर्थाने माझा शिक्षक असून या शिक्षकाने शिकवलेला प्रत्येक धडा पुढील करिअरमध्ये कामी येणारा आहे, अशा शब्दांत जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी शिक्षक दिनानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या. जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्यामध्ये एक शिक्षकही लपलेला आहे. आपल्याला मिळालेले ज्ञान इतरांच्या कामी यावे, या उदात्त हेतूने त्यांनी वाशिम येथे जिल्हाधिकारी असताना स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सरकारी सुटी असताना वाशिम येथील नवोदय विद्यालयात जाऊन ते विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे धडे देत. त्यामुळे आठ विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळाले. या कामामुळे त्यांनी वर्षभरात केवळ दोनच सुट्या घेतल्या. याबद्दल त्यांचे विशेष कौतुकही झाले. त्यांनी  आयआयटीतील सहकारी मित्रांनाही या प्रशिक्षणासाठी बोलावले होते. एका सनदी अधिका-यातील शिक्षक त्यांच्या रूपाने येथे पहायला मिळाला. खासगी नोकरी सोडून यूपीएससीचा अभ्यास माझे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे झाले. वडील खासगी नोकरी करीत होते. आई, वडील, भाऊ यांचे सततचे मार्गदर्शन असल्याने अभ्यासात चांगली रूची निर्माण झाली. परिणामी चेन्नई येथील आयआयटीत प्रवेश मिळाला. आयआयटीतून पदवी घेतल्यानंतर दोन वर्षे खासगी कंपनीत नोकरी केली. परंतु तेथे मन रमेना म्हणून यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. २००६ मध्ये यूपीएससीच्या अभ्यासासाठी दिल्ली गाठली. तीन वर्षे परिश्रम घेतल्यानंतर २००८मध्ये अखेर सिव्हील सर्व्हिसचे स्वप्न पूर्ण झाले. इथपर्यंतच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर अनेकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यात सर्वच शिक्षक, आई, वडील, भाऊ यांचा वाटा होता. कोणताही मनुष्य परिपूर्ण नाही. आयुष्यातील या शाळेत शिपायापासून अधिकाºयांपर्यत प्रत्येकाकडून काहीना काही शिकायला मिळते. तो प्रत्येकजण तुमचा गुरूच असतो, असे सांगताना जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी शिक्षक दिनानिमित्त त्या सर्वांबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त केली, ज्यांनी त्यांना घडवले. अहमदनगर आव्हानात्मक जिल्हा... राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने जसा नगर जिल्हा मोठा आहे, तसेच नगरचे राजकीय, सामाजिकदृष्ट्या राज्यात वजन आहे. त्यामुळे अशा जिल्ह्यात काम करणे आव्हानात्मक होते. परंतु सर्वांच्या सहकार्याने हे आव्हान आपण लिलया पेलले. भविष्यात राज्यात कोणत्याही ठिकाणी काम करताना नगरचा भक्कम अनुभव कामी येईल. त्यामुळे नगर जिल्हा आपला खरा शिक्षक आहे, ज्याने खूप शिकवले, असे जिल्हाधिकारी अभिमानाने सांगतात. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीAhmednagarअहमदनगर