शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे यांचा रिमोट कंट्रोल सिल्वर ओक मध्येच - राधाकृष्ण विखे पाटील 

By सुदाम देशमुख | Updated: April 16, 2023 17:50 IST

उद्धव ठाकरे यांचा रिमोट कंट्रोल सिल्वर ओक मध्येच असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. 

अहमदनगर : स्वातंत्र्यवीर सावकरांचा काॅग्रेस नेत्यांकडून होत असलेला अपमान उध्दव ठाकरे शांतपणे बघत असल्याचे आश्चर्य वाटते. सतेसाठी विचार सोडणा-या उध्दव ठाकरे यांचा रिमोट कंट्रोल सिल्व्हर ओक असल्याने  स्वत:चे मत व्यक्त करण्याचे धैर्य देखील त्यांच्यात राहिले नसल्याची टिका महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

अहमदनगर येथे माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्यात आघाडीच्या वज्रमूठ सभा सुरू असल्यातरी,ही वज्रमूठ केव्हा सैल होईल यांना कळणार नाही. महाविकास आघाडीत सुरू झालेले मतभेद पाहाता तीन पक्षांचे नेतेच भविष्यात एकमेकांवर मूठ उगारल्या शिवाय राहाणार नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला.

 वज्रमूठ सभांवर टिका करताना मंत्री विखे पाटील म्हणाले,  की, विरोधकांकडे कुठलाही अजेंडा नाही त्यामुळे ते अशा वज्रमूठ सभा घेत फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. सता गेल्याने  वैल्यग्रस्त झाले असून, उद्धव ठाकरे यांचा  रिमोट  कंट्रोल  आता  सिल्वरओकवर असल्याने  ते स्वताचे मतही आता मांडू शकत नाहीत.

महाविकास आघाडीने  प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचा सल्ला देत विखे म्हणाले की, महाविकास आघाडी फक्त व्यक्तिद्वेषाने पछाडली आहे.खालच्या पातळीवर जावून टीका करण्याचे काम त्यांच्याकडून होत असून, स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर टीका करणारे राहुल गांधी यांच्या करिता आता मातोश्रीवर लाल कार्पेट टाकण्याची तयारी सुरू  आहे.  सावकरांवरील टिका सहन करत  त्यांच्या मांडीला मांडी लावून उध्दव ठाकरे सभा घेत बसणार असतील तर हे कुठले हिंदुत्व ? असा सवाल मंत्री विखे पाटील यांनी केला.

 रोज हे सरकार पडेल अशी विश्व प्रवक्त्यांची भविष्यवाणी हास्यास्पद असून सध्या महाविकास आघाडीत भविष्यकारांची संख्या वाढली आहे. अजित पवार यांचे भाजपशी अलीकडच्या काळात नाव जोडले जात असून यात किती तथ्य आहे यावर बोलताना ते म्हणाले की या बाबत अजित पवार हेच अधिक सांगू शकतील. राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून एकही शेतकरी मदती पासून वंचित राहणार नाही असे सांगितले. जिल्हा प्रशासनास तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून यावर कार्यवाही सुरू असल्याचे शेवटी विखे पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरUddhav Thackerayउद्धव ठाकरेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील