शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

सावकराचे खरेदी खत ठरवले अवैध

By admin | Updated: April 14, 2017 17:04 IST

मुलीच्या लग्नासाठी वाकी येथील शेतकरी अशोक सोरटे यांनी कर्ज घेण्यासाठी एक हेक्टर जमिनीचे खरेदीखत परत सोडवण्याच्या बोलीवर सावकाराला दिले.

जामखेड(अहमदनगर): मुलीच्या लग्नासाठी वाकी येथील शेतकरी अशोक सोरटे यांनी कर्ज घेण्यासाठी एक हेक्टर जमिनीचे खरेदीखत परत सोडवण्याच्या बोलीवर सावकाराला दिले. ३६ टक्के व्याजदराने पैसे देऊनही सावकाराने त्रयस्थ व्यक्तीला ती शेतजमीन सात वर्षांनी विकली. एका सामान्य शेतकºयाने सावकाराविरोधात पुरावे जमा करून जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली. जिल्हा उपनिबंधकांनी या तक्रारीवर निकाल देत सावकाराने नावावर करून घेतलेले खरेदीखत अवैध ठरवत मालकी हक्कासह अभिहस्तांतरण करण्याचा आदेश दिला. शेतकरी सोरटे यांनी परवानाधारक सावकार भारतलाल खिंवसरा यांच्याकडून कर्ज घेतले होते. ते कर्ज ३६ टक्के व्याजदराने फेडले. तरीही शेतजमीन सावकाराने परत दिली नाही. उलट जमिनीची विक्री केली. कर्जाच्या रकमेसाठी जमिनी गहाण ठेवण्याऐवजी सावकार शेतकºयांचा जमिनी नावावर करून घेत असल्याची तक्रार तत्कालीन जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांच्याकडे ४ आॅगस्ट २०१४ रोजी सोरटे यांनी केली होती. हौसारे यांनी आपल्या कार्यालयात वेळोवेळी सुनावणी घेतल्या होत्या. जिल्हा उपनिबंधक हौसारे यांनी त्यावर जामखेड येथील सहायक निबंधक अनिल गायकवाड यांना चौकशीचा आदेश करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. सहायक निबंधक अनिल गायकवाड यांनी २३ डिसेंबर २०१५ रोजी जिल्हा उपनिबंधकांकडे अहवाल सादर केला. सदर अहवालात त्यांनी परवानाधारक सावकार खिंवसरा सावकारकीच्या ओघात स्थावर मालमत्ता संपादित करीत आहेत. याबाबत शेतजमिनीचे खरेदीखत व कालांतराने परत दिल्याचे पुरावे आहेत. तालुका उपनिबंधक गायकवाड यांच्या अहवालानुसार जिल्हा उपनिबंधक हौसारे यांनी ५ जानेवारी २०१६ रोजी सहायक निबंधक गायकवाड यांना पत्रव्यवहार करून बेकायदेशीर सावकारकी आढळून येत असल्यास तत्काळ गुन्हा दाखल करावा व या कार्यालयाला सदर प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. जिल्हा उपनिबंधकांकडील सुनावणीदरम्यान तक्रारदार सोरटे यांनी परवानाधारक सावकाराचे कार्यक्षेत्र खर्डा व परिसरापर्यंत मर्यादित आहे. तरीही त्यांनी बेकायदेशीरपणे वाकी, लोणी, मोहरी तेलंगसी, तसेच भूम (जि. उस्मानाबाद) येथील सावरगाव, जेजला, नळीवडगाव, आंतरवली येथे सावकारकीच्या नावाखाली ३१ च्या आसपास शेतकºयांच्या शेतजमीन खरेदी केली आहे व १९ जणांना परत खरेदीखत उलटून दिले आहे. याबाबतचे पुरावे सादर केले. यामुळे जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी ३१ मार्च रोजी आदेश देऊन अर्जदार सोरटे यांनी दिलेले खरेदीखत अवैध घोषित केले. व ते मालकी हक्कासह अभिहस्तांतरण करण्यात येत आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, वाकी तलाठी यांना निकालाच्या प्रती पाठवल्या आहेत. शेतकरी सोरटे यांनी एक हेक्टर शेतजमीन परत मिळविण्यासाठी पाच वर्षांपासून लढा दिला. तत्कालीन जिल्हा उपनिबंधक दिगांबर हौसारे यांनी सव्वा वर्षापूर्वी सहायक निबंधक अनिल गायकवाड यांना सावकार भारतलाल खिंवसरा यांच्यावर बेकायदेशीर सावकारी आढळल्यास गुन्हा दाखल करण्यास पत्राद्वारे सांगितले होते, परंतु, त्याची अद्याप दखल घेतली नाही. विशेष म्हणजे गायकवाड यांनीच २०१५ मध्ये जिल्हा उपनिबंधक यांना अहवालात मत व्यक्त केले आहे. शेतकरी अशोक सोरटे यांनी वर्षभरापासून आयकर विभाग, अहमदनगर व पुणे यांना वेळोवेळी चाळीसच्या आसपास खरेदीखत व परत केलेले व्यवहार निदर्शनास आणून दिले आहे. परंतु, त्यांनी त्याची दखल घेतली गेली नाही. याबाबत चौकशीची मागणी सोरटे यांनी केली आहे.