शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

मनोरुग्ण तरुणीवर शिर्डीत सामूहिक अत्याचार: गरोदर असल्याने उपचार सुरू

By सुदाम देशमुख | Updated: November 17, 2022 21:40 IST

चार महिन्यांपूर्वीची घटना, तरुणीच्या जबाबावरुन गुन्हा दाखल

अहमदनगर : नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या २१ वर्षीय मनोरुग्ण तरुणीवर शिर्डीत पाच नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. पीडितेच्या जबाबावरून येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. १६) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.पीडिता ही मनोरुग्ण असून, १४ जुलै २०२२ रोजी बेपत्ता झाली होती. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात संबंधित तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती. ती शिर्डीत आल्यानंतर साईबाबा मंदिर परिसरात थांबली होती.

तिथे पाच तरुण तिला भेटले. त्यांनी तिला जेवण देतो, असे सांगून एका खोलीत नेऊन तिच्यावर वारंवार सामूहिक अत्याचार केला. ही घटना चार महिन्यांपूर्वीची आहे. पीडितेवर अत्याचार झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिला एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघड झाल्यानंतर जबाबावरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मनोरुग्ण असल्याचा फायदा घेत पाच नराधमांनी पीडितेवर वारंवार अत्याचार केला. यामधून ती चार महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. पीडितेवर नगरमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास एमआयडीसीचे उपनिरीक्षक दीपक पाठक करीत आहेत.

पोलिसांसमोर तपासाचे आव्हानपीडितेच्या जबाबावरून गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, पीडितेचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्याने व घटना गत चार महिन्यांपूर्वीची असल्याने पोलिसांसमोर आरोपींचा शोध लावण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.एसपी ओला शिर्डीत दाखलगुन्हा दाखल करण्यात झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक राकेश ओला व इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी गुरुवारी शिर्डीत दाखल झाले होते. पीडितेवर मंदिर परिसरातच अत्याचार झाल्याने लॉज, हॉटेल्सची माहिती घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :shirdiशिर्डीCrime Newsगुन्हेगारी