शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

नितेश राणे भगाव.. नगर बचाव... म्हणत युवकांची बाजारपेठेत निदर्शने

By साहेबराव नरसाळे | Updated: April 19, 2023 16:30 IST

मंगळवारी भाजप आमदार नितेश राणे यांनी कापड बाजारात चौकसभेत अनेक आरोप केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर : मंगळवारी भाजप आमदार नितेश राणे यांनी कापड बाजारात चौकसभेत अनेक आरोप केले. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी राणेंना आमच्या पन्नास हजार हिंदू तरुण बांधवांसाठी रोजगार देत दहा हजार कोटींचे एमआयडीसी, बाजारपेठेसाठी पॅकेज आणण्याचे आवाहन केले होते. राणेंनी याबाबत ब्र सुद्धा न काढल्याने युवक काँग्रेसमधील संतापलेल्या युवकांनी बाजारपेठेत रस्त्यावर उतरत 'नितेश राणे भगाव, नगर बचाव'चा नारा देऊन निदर्शने केली आहेत. नवी पेठ चौकात जय श्रीरामच्या घोषणा देत राणे यांचा निषेध केला.

प्रवीण गीते म्हणाले, राणेंना आम्हा हिंदू तरुणांच्या हातामध्ये एकमेकांची माथी फोडण्यासाठी दगडं द्यायची आहेत. हिंदू असल्याचा आम्हाला अभिमान आहे. राणे ढोंगी हिंदुत्ववादी नाहीत हे त्यांनी सिद्ध करावे. ते शहरात हिंदुत्वासाठी तसेच आमच्या हिंदू व्यापारी बांधवांसाठी आले नव्हते तर भाजपच्या २०१४ च्या निवडणुक प्रचारासाठी आले होते. हिंदू व्यापाऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर त्यांच्यावर हल्ले करणाऱ्यांना अटक करा. माञ व्यापारी चिपाडे, नवलानींवरील काही हल्लेखोर राणेंच्या दौऱ्यानंतरही फरार आहेत.   युवकांनी विचारले राणेंना सात जाहीर प्रश्न : 

१) तुमच्या भडकाऊ भाषणांमुळे गुन्हे दाखल झाल्याने नोकऱ्या मिळत नाहीत. हिंदू युवकांसाठी कायदा बदलून आरोप असतानाही नोकऱ्याचा विशेष जीआर सरकार कधी काढणार आहे ?

२) गुन्ह्यांमुळे प्रतिमा मलिन झाल्यामुळे लग्नाला कोणी पोरगी देत नाही. सरकार आमची लग्न जमवण्याची जबाबदारी घेणार आहे की नाही ?

३) अन्य धर्मीय उद्योजक, व्यापाऱ्यांकडे काम करून कुटुंब पोसणाऱ्या आमच्या कष्टकरी हिंदू बापांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी विशेष पॅकेज कधी जाहीर करणार आहे ?

४) तुम्ही धार्मिक रंग दिल्यामुळे दोन व्यापाऱ्यांमधील सुरु झालेले वैयक्तिक भांडण संपूर्ण बाजारपेठेसह आमच्या सर्व हिंदू व्यापाऱ्यांना उध्वस्त करण्यावर येऊन ठेपले आहे. यात आमच्या अन्य हिंदु व्यापाऱ्यांचा, दुकानांमध्ये काम करणाऱ्या हिंदू गोरगरीब कामगारांचा दोष काय ?

५) व्यापाऱ्यांशी असणाऱ्या सलोख्याच्या संबंधातून आमचे हिंदू बांधव, माता, भगिनी हातगाडीवाले, फेरीवाले पोटाची खळगी भरतात. अन्य धर्मीयांना जेसीबी लावताना हिंदूं फेरीवाल्यांवर ही तुम्ही, खासदारांनी, आमदारांनी प्रशासनाला आदेश देऊन कारवाई केली. आम्ही हिंदू असूनही तुम्ही संसाराची राख रांगोळी का केली ? हिंदूंसाठी तरी फेरीवाला धोरण अंमलबजावणी करणार आहात की नाही ? 

६) हिंदूंसाठी पेट्रोल, डिझेल पन्नास रुपये लिटर कधी करणार आहात ? 

७) हिंदूंसाठी गॅस तीनशे रुपये कधी करणार आहात ?  असे प्रश्न या तरुणांनी उपस्थित केले. यावेळी गीते, अल्हाट यांच्यासह विकास भिंगारदिवे, योगेश जाध,व विकास साळवे, शंकर आव्हाड, प्रणव मकासरे, गौरव घोरपडे, सुजित क्षेत्रे, मयूर भिंगारदिवे, अक्षय गायकवाड आदी उपस्थित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNitesh Raneनीतेश राणे