शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

आदिवासी आरक्षणाच्या रक्षणासाठी पिचड मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 12:06 IST

पिचड म्हणाले, 3 आक्टोबर रोजी सामाजिक न्याय विभागाने जात वैधता प्रमाणपत्र तपासणी न करता ते देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. कायद्याच्या पद्धतीत तो आदिवासी विकास विभागाला लागू होतो. सदर निर्णय बेकायदेशीर व आदिवासी जमातीच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारा आहे.

ठळक मुद्देमधुकरराव पिचड म्हणाले...बोगस आदिवासींच्या बेकायदेशीर मागणीला महाराष्ट्र सरकार बळी पडले.काही अधिका-यांनी पैसे घेऊन बोगस प्रमाणपत्र दिल्याचे अगोदरच उघड झाले आहेबोगस आदिवासींवर गुन्हा दाखल करून प्रशासकीय कारवाई करणे आवश्यक आहे.

अकोले : रक्ताच्या नातेवाईकांचे जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र ग्राह्य धरून हा अंतिम पुरावा मानावा, असे म्हणणारे शासनाचे धोरण चुकीचे आहे. या निर्णयामुळे बोगस आदिवासींची संख्या अधिक वाढेल व घुसखोर आदिवासींना यामुळे संरक्षण मिळेल. पर्यायाने मूळ आदिवासींवर अन्याय होईल़ त्यामुळे हा निर्णय आदिवासी विभागाला लागू करू नये, अशी मागणी करीत माजी आदिवासी मंत्री मुधकरराव पिचड यांनी आदिवासी समाजाच्या रक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे़माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका विषद केली. यावेळी माजीमंत्री पद्माकर वळवी, माजी आ. शिवराम झोले उपस्थित होते. पिचड म्हणाले, याप्रश्नी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे. तसेच त्यांची व राज्यपालांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.पिचड म्हणाले, 3 आक्टोबर रोजी सामाजिक न्याय विभागाने जात वैधता प्रमाणपत्र तपासणी न करता ते देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. कायद्याच्या पद्धतीत तो आदिवासी विकास विभागाला लागू होतो. सदर निर्णय बेकायदेशीर व आदिवासी जमातीच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारा आहे. आदिवासी हे निसर्ग धर्म पालन करणारे, स्वतंत्र वैशिष्ट्ये असणारी जमात असून भारतीय राज्यघटनेने प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र अनुसूचित जमातीची यादी जाहीर केली आहे व आदिवासींना आरक्षण व इतर स्वतंत्र कायदेशीर अधिकार व सुविधा दिल्या जात आहे. त्यांच्या आरक्षणातील रिक्त जागा व आदिवासी समाजातील शैक्षणिक आरक्षण, शासकीय सेवेतील आरक्षण, राजकीय आरक्षण व भारत सरकारच्या विविध आरक्षित जागेवर प्रवेश करण्यासाठी व घटनात्मक तरतुदींवर आक्रमण करण्यासाठी बिगर आदिवासी व्यक्ती खोट्या जातीचे प्रमाणपत्र व खोटे वैधता प्रमाणपत्र घेऊन आदिवासींचे आरक्षण हडप करीत आहे. याबाबत बोगस आदिवासींवर गुन्हा दाखल करून प्रशासकीय कारवाई करणे आवश्यक आहे. त्याऐवजी शासन बोगस आदिवासींना संरक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहे ही बाब निषेधार्ध आहे. राज्यातील खोटे जातीचे प्रमाणपत्र धारण करणाºया व्यक्तींनी, भ्रष्ट प्रवृत्तींनी शासकीय अधिकाºयांची दिशाभूल करून महसून विभागाला फसवून मोठ्या प्रमाणावर आदिवासींच्या नावाने खोटे जातीचे दाखले मिळविले आहेत. सदर दाखले शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश घेताना, शासकीय नोकरीत प्रवेश करताना, उच्च पदावर बढती घेऊन बोगस आदिवासींनी आरक्षणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सन 2000 मध्ये जातपडताळणी कायदा केला व राज्यात लागू केला. जात पडताळणी समिती सन 1982 पासून महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहे. सादर समिती जातपडताळणी करण्यास सक्षम व कायदेशीर असल्याचे उच्च व सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच मान्य केलेले आहे. जात वैधता प्रमाणपत्र तपासणी समिती त्यांचे अर्धन्यायिक अधिकार वापरुन कायद्याद्वारे व शासनाच्या आदेशाचे पालन करीत आहे.काही वैधता समितीतील अधिका-यांनी पूर्ण चौकशी न करता दक्षता पथकाच्या अहवालाची दखल न घेता, अधिका-यांनी पैसे घेऊन वैधता प्रमाणपत्र अनुसूचित जमातीच्या नसलेल्या व्यक्तीला व उमेदवारांना या आधी दिल्याचे निदर्शनास आले आहे. सन 2000 च्या जात पडताळणी कायद्याच्या नियम 11 व 12 मध्ये स्पष्ट तरतूद केली आहे. कायद्यातील व नियमातील तरतुदीप्रमाणे प्रशासकीय कामकाज समितीने करावे असेच अपेक्षित आहे. बोगस आदिवासी वडिलांच्या रक्तातील नात्यातील नियमबाह्य पद्धतीने घेतलेल्या वैधता प्रमाणपत्राच्या आधारे इतर नातेवाईकांना वैधता प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी शासनाकडे ते करीत आहे. बोगस आदिवासींच्या बेकायदेशीर मागणीला महाराष्ट्र सरकार बळी पडले. सामाजिक न्यायविभागाने वैधता प्रमाण पत्रासंदर्भात घेतलेल्या निर्णयाला आम्ही आदिवासी समाज व नेते विरोध करीत असून हा निर्णय आदिवासी विकास विभागाला म्हणजेच आदिवासींना लागू करू नये, अशी मागणी पिचड यांनी यावेळी केली.