शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

जाचक अटीत अडकले प्रस्ताव : अवघ्या दोन छावण्यांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 12:25 IST

जिल्ह्यात भीषण दुष्काळी स्थिती असताना पशुधन वाचवण्यासाठी शासनाने छावण्या सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी जिल्ह्यात अद्याप केवळ दोनच छावण्यांना मंजुरी मिळालेली आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात भीषण दुष्काळी स्थिती असताना पशुधन वाचवण्यासाठी शासनाने छावण्या सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी जिल्ह्यात अद्याप केवळ दोनच छावण्यांना मंजुरी मिळालेली आहे. छावण्या सुरू करण्याच्या प्रक्रियेत अनेक जाचक अटी असल्याने प्रस्ताव अडकून पडले आहेत. परिणामी शेतकऱ्यांना पशुधन वाचवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.जिल्ह्यात चाºयाची भीषण टंचाई निर्माण झाल्याने शासनाने मंडलस्तरावर जनावरांसाठी छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी छावणीचालकांकडून ८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविण्यात आले. परंतु प्रतिसाद कमी असल्याने त्यास मुदतवाढ देण्यात आली. तालुकास्तरावरून तहसीलदार हे प्रांत कार्यालयाकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठवत आहेत. परंतु तेथून पुढे प्रस्तावांत अनेक त्रुटी निघाल्याने प्रस्ताव अपात्र ठरत आहेत. काही ठिकाणी तर पात्र प्रस्ताव पुढे जाण्यास कमालीचा विलंब होत आहे. त्यामुळे छावण्या सुरू होण्यास मुहूर्त लागेना. छावण्या सुरू करण्यास तलाठी, ग्रामसेवक, पशु अधिकारी, मंडलाधिकारी, तहसीलदार आदींच्या स्वाक्षºया, स्थानिक आमदारांची शिफारस असा मोठा प्रवास आहे. या अधिका-यांना शोधून सह्या घेण्यातच छावणीचालक दमले आहेत.एवढे करूनही परिपूर्ण प्रस्ताव तहसीलदार किंवा प्रांत कार्यालयात घुटमळत आहेत. अंतिम प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येऊन तेथे पालकमंत्र्यांच्या संमतीने प्रस्ताव मंजूर होणार आहेत. फेब्रुवारी महिना संपत आला तरी छावण्या सुरू होण्याच्या हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे जिल्ह्याभरातील लाखो संख्येने असलेले पशुधन वाचवायचे कसे असा प्रश्न शेतक-यांसमोर उभा आहे. यापुढे दुष्काळी तीन महिने आहेत. त्यातही मेच्या मध्यानंतर मशागतीसाठी शेतकरी जनावरे घेऊन जातात. त्यामुळे केवळ अडीच महिने छावण्या सुरू राहणार आहेत. परंतु त्याही शासनाला सुरू करता येत नसल्याने शेतक-यांत तीव्र नाराजी आहे.लोकसहभागातील छावण्यांकडेही दुर्लक्षशासन छावण्या सुरू करत नसल्याने जिल्ह्यातील काही भागांत लोकसहभागातून छावण्या सुरू करण्यात आल्या. पाथर्डी तालुक्यातील भोसे, खोजेवाडी, तसेच श्रीगोंदा तालुक्यातील घुटेवाडी येथे गेल्या महिनाभरापासून छावण्या सुरू आहेत. शेतक-यांनी वर्गणी करून, देणग्या मिळवून या छावण्या सुरू केल्या आहेत. या छावण्यांसाठी लाखो रूपये खर्च येत आहे. त्यामुळे येथील सामाजिक संस्थांनी छावणीचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. परंतु त्यांनाही अद्याप मंजुरी नाही. त्यामुळे या छावण्याही बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे. शासन दुर्लक्ष करत असल्याने शेतक-यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय