शेवगाव : तालुक्यातील अमरापूर येथे बुधवारी (दि. २३) सकाळी, जनशक्ती आघाडीच्यावतीने कोरोना काळात कोविड सेंटरमध्ये सेवा बजावणाऱ्या डॉक्टर व आरोग्य सेवकांचा नागरी सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांची गावातून मिरवणूक काढून घरोघरी औक्षण करण्यात आले.
यावेळी पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, नायब तहसीलदार रमेश काथवटे, जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे, प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. कैलास कानडे, सुरेश पाटेकर, गडचिरोली येथील उपविभागीय अधिकारी गणेश मोटकर, डॉ. श्वेता फलके, डॉ. विजय फलके, डॉ. अरविंद पोटफोडे, डॉ. मुकुंद गमे, डॉ. सोमनाथ काटे, डॉ. प्रमोद नेमाने, डॉ. गणेश पाडळे, डॉ. रोहित पाटील, जगन्नाथ गावडे, सरपंच विजय पोटफोडे, बाळासाहेब मरकड, भाऊसाहेब कणसे, जालिंदर कापसे, संजय खरड, दिलीप भुसारी, सुरेश चौधरी, राजेंद्र पोटफोडे, अशोक मस्के, अशोक काळे, आसाराम शेळके, बाळासाहेब पाटेकर, रमेश भालसिंग, संतोष चोरडिया, हरिश्चंद्र निजवे, अजीम शेख, रघुनाथ सातपुते, म्हातारदेव आव्हाड, आबासाहेब राऊत, शंकराव काटे आदी उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे होते. काकडे म्हणाले, कृतज्ञता हा मानवी जीवनातील सर्वात मोठा आविष्कार आहे व हे संस्कार पुढील पिढीत रुजविण्यासाठी कोविड सेंटरमधील डॉक्टर व आरोग्य सेवकांचा गौरव करत आहे.
यावेळी प्रशांत भराट, राजेंद्र गर्जे, बाबा इनामदार, डॉ. विजय लांडे, सुखदेव खंडागळे, वैभव पूरनाळे, रघुनाथ घोरपडे, तुळशीराम रुईकर, शंकर काकडे, शिवाजी कणसे, मुखेकर महाराज, भोसले महाराज, मल्हारी अडसरे, पाराजी नजन आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक राजेंद्र पोटफोडे यांनी केले, तर प्राचार्य अरुण वावरे यांनी आभार मानले.
---
फोटो आहे