शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कामगाराच्या मुलाचे पगारासाठी पंतप्रधानांना साकडे; तनपुरे साखर कारखान्याने थकविला ५० महिन्यांचा पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 15:04 IST

डॉक्टर बा.बा तनपुरे सहकारी साखर कारखान्याने कामगारांचे ५० महिन्यांचे पगार थकविले आहेत. उपासमार सहन करणा-या कामगारांना दिलासा मिळावा म्हणून कामगाराचा मुलगा निखील चंद्रकांत कराळे यांनी दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून हस्तक्षेप करण्याची साकडे घातले आहे.

राहुरी : येथील डॉक्टर बा.बा तनपुरे सहकारी साखर कारखान्याने कामगारांचे ५० महिन्यांचे पगार थकविले आहेत. उपासमार सहन करणा-या कामगारांना दिलासा मिळावा म्हणून कामगाराचा मुलगा निखील चंद्रकांत कराळे यांनी दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून हस्तक्षेप करण्याची साकडे घातले आहे. तनपुरे साखर कारखाना हा खासदार डॉ. सुजय विखे यांच्या ताब्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून कामगारांचे पगार देण्याचा आदेश देवा अशी विनंती कराळे यांनी पत्राद्वारे केली आहे. कारखान्याच्या पगार मिळावा म्हणून कामगारांनी अनेकदा आंदोलने केली. तरी देखील कारखान्याने पगार देण्यासाठी टाळाटाळ केली आहे. कामगारांचे पगार देण्याचे शासनाचे धोरण असतानाही कारखाना मात्र पगार देत  नाही. कामगारांकडे पैसा नसल्याने त्यांच्या मुलांचे शिक्षणही धोक्यात आले आहे, असेही असे कराळे यांनी पत्रात म्हटले आहे.   पगारासाठी केवळ आश्वासनेचलॉकडाऊनच्या काळात कामगारांचे पगार थकित ठेवू नयेत, असा शासनाचा आदेश आहे. मात्र डॉ.बाबा तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांचे ५० महिन्यांच्या पगाराचे १०० कोटी रुपये थकले आहेत. याबाबत कामगारांनी संचालक मंडळाकडे वारंवार पाठपुरावा केला. याशिवाय अनेक वेळा आंदोलनही छेडली. पगार देऊ एवढेच आश्वासन संचालक मंडळाच्या वतीने देण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पगारासंदर्भात साकडे घालण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असली तरी अद्याप कामगारांना पगार मिळालेले नाही. पगार देता येत नसतील तर कामगारांना आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कारखान्याचे कामगार चंद्रकांत कराळे यांनी केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीSugar factoryसाखर कारखानेLabourकामगार