शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

लष्करी जवानांमुळे वाचले चिमुकल्याचे प्राण; वाघुंडे गावाजवळ स्कूल बसला अपघात, ८ विद्यार्थ्यांसह बसचालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 19:00 IST

अहमदनगर-पुणे रस्त्यावरील वाघुंडे गावाजवळ भरधाव वेगाने येणा-या ट्रकने स्कूल बसला मागून जोराची धडक दिल्याने बस पलटी झाली. यामध्ये एक चिमुकला विद्यार्थी बसखाली हात सापडल्याने अडकला. ही परिस्थिती पाहून रस्त्याने चाललेल्या लष्करी जवानांनी धाव घेत एकीच्या बळावर बस उचलत चिमुकल्याचा प्राण वाचला.

सुपा : अहमदनगर-पुणे रस्त्यावरील वाघुंडे गावाजवळ भरधाव वेगाने येणा-या ट्रकने स्कूल बसला मागून जोराची धडक दिल्याने बस पलटी झाली. यामध्ये एक चिमुकला विद्यार्थी बसखाली हात सापडल्याने अडकला. ही परिस्थिती पाहून रस्त्याने चाललेल्या लष्करी जवानांनी धाव घेत एकीच्या बळावर बस उचलत चिमुकल्याचा प्राण वाचला. ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात ८ विद्यार्थ्यांसह बसचालक जखमी झाला आहे. अपघात झाल्यानंतर पळून गेला.अहमदनगर-पुणे महामार्गावर शनिवार २३ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दिवटे पाटील पब्ल्कि स्कूलची स्कूल बस (क्रमांक एम.एच. १६, बी.सी. १०७) शाळा सुटल्यानंतर विद्यारर्थ्यांना घरी सोडण्यासाठी पुण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत होती. यामध्ये एकूण २५ ते ३० विद्यार्थी होते. पारनेर तालुक्यातील वाघुंडे गावाजवळ बस असताना मागून भरधाव वेगाने येणा-या ट्रकने (क्रमांक एम.एच.- १६, ए.ई.- ३२८३) बसला धडक दिली. धडकेमुळे बस पलटी झाली. याचवेळी रस्त्याने लष्करी जवान जात होते. अपघात पाहताच वाहने थांबवत जवानांनी बस उचलत ओम शिवले या चिमुकल्याची सुटका केली. या जवानांनी बसमधील सर्व मुलांना तातडीने उपचारासाठी सुप्यातील खासगी दवाखान्यात हलवले. या मदतकार्यात ग्रामस्थही सहभागी झाल्याचे वाघुंडेचे सरपंच संदीप मगर यांनी सांगितले. ओम शिवले व सूरज कुलट यांच्यावर सुप्यात उपचार करण्यात आले. शिवले या विद्यार्थ्यास जास्त मार लागण्याने पुढील उपचारासाठी पुण्यास पाठवल्याचे डॉ. बाळासाहेब पठारे यांनी सांगितले. कृष्णा कुटे, पूजा कुटे, सृष्टी भांगरे, आदित्य दिवटे, निधी शिवले, पृथ्वीराज कार्ले यांच्यावर प्रथमोपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. बसचालक चंद्रकांत फलके यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर