शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

उसाचा ३४०० रुपये भाव मिळावा, यासाठी राहुरीत ‘स्वाभीमानी’चा एल्गार, प्रसाद शुगर फॅक्टरीवर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 12:40 IST

शेवगावमधील शेतकरी आंदोलनाची धग कमी होत नाही तोच आता राहुरीतही ऊस दरावरुन आंदोलन पेटले आहे. उसाचा ३४०० रुपये प्रति टन पहिली उचल मिळावी, यासाठी शेतकरी संघटनेने राहुरी तालुक्यात एल्गार आंदोलन सुरु केले आहे.

ठळक मुद्देशेवगावमधील शेतकरी आंदोलनाची धग कमी होत नाही तोच आता राहुरीतही ऊस दरावरुन आंदोलन पेटले आहे. उसाचा ३४०० रुपये प्रति टन पहिली उचल मिळावी, यासाठी वांबोरी येथील प्रसाद शुगर फॅक्टरीवर संघटनेने आंदोलन पुकारले आहे.काही अनुचित घटना होऊ नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राहुरी : शेवगावमधील शेतकरी आंदोलनाची धग कमी होत नाही तोच आता राहुरीतही ऊस दरावरुन आंदोलन पेटले आहे. उसाचा ३४०० रुपये प्रति टन पहिली उचल मिळावी, यासाठी शेतकरी संघटनेने राहुरी तालुक्यात एल्गार आंदोलन सुरु केले आहे.उसाला प्रति टन ३४०० रुपये भाव मिळावा, यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने काटा बंद आंदोलन हाती घेतले असून, वांबोरी येथील प्रसाद शुगर फॅक्टरीवर संघटनेने आंदोलन पुकारले आहे. काही अनुचित घटना होऊ नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.ऊस उत्पादक शेतक-यांची फसवणूक करण्याचे धोरण अवलंबिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना शुक्रवारपासून जिल्हाभर आंदोलन उभारणार असल्याची घोषणा रवींद्र मोरे यांनी गुरुवारी केली होती. त्यानुसार त्यांनी आजपासून आंदोलन सुरु केले आहे. उसाला ३४०० रूपये प्रति टन भाव मिळाल्याशिवाय गव्हाणीकडे ऊस जाऊ दिला जाणार नाही, अशी भूमिका घेत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने वांबोरी येथील प्रसाद साखर कारखान्याचा वजन काटा बंद पाडला आहे. आंदोलनाची माहिती मिळताच कारखान्याचे अध्यक्ष प्राजक्त तनपुरे हे कारखानास्थळी झाले आहेत. आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, नगरहून राज्य राखीव दलाची तुकडीही वांबोरीत दाखल झाली आहे. आंदोलनस्थळी संघटनेच्यावतीने जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. दरम्यान तनपुरे यांनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी