शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये ३२१ उपद्रवी शहराबाहेर प्रतिबंधात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 16:00 IST

गणेशोत्सव आणि मोहरमनिमित्त पोलिसांनी दाखल केलेल्या प्रस्तावांवर शुक्रवारी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांनी सुनावणी घेत ३२१ जणांना उत्सवकाळात शहरबंदी केली आहे तर ३८४ जणांकडून चांगल्या वागणुकीचे हमीपत्र घेण्यात आले आहेत़ 

अहमदनगर: गणेशोत्सव आणि मोहरमनिमित्त पोलिसांनी दाखल केलेल्या प्रस्तावांवर शुक्रवारी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांनी सुनावणी घेत ३२१ जणांना उत्सवकाळात शहरबंदी केली आहे तर ३८४ जणांकडून चांगल्या वागणुकीचे हमीपत्र घेण्यात आले आहेत़ धार्मिक उत्सवात कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी सहाशेपेक्षा जास्त जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे प्रस्ताव तयार केले आहेत़ हे प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले होते़ प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर या सुटीवर असल्याने पोलिसांकडून आलेल्या प्रस्तावांवर पाटील यांनी सुनावणी घेतली़ गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मागील वर्षीही सहाशेपेक्षा जास्त उपद्रवींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात अशा स्वरुपाची कारवाई करण्यात आली होती़ लोकसभा निवडणुकीत बहुतांशी जणांवर सहा महिने ते एक वर्षांसाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती़ त्यांचा कारवाईचा कार्यकाळ अजून संपलेला नाही़ त्यामुळे यावेळी प्रतिबंधात्मक कारवाईच्या प्रस्तावाचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत कमी होते़विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्यांवर ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे़ ज्यांना उत्सवकाळात शहरातून हद्दपार करण्यात आले आहे त्यांच्यावर पोलिसांची नजर राहणार आहे़ हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये काही राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाही समावेश आहे़ 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर