शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

प्रशांत बंब -राजेंद्र पिपाडा बनले व्याही; साध्या पध्दतीने केला विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 18:19 IST

गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांची कन्या श्रृती आणि राहाता येथील ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पिपाडा व नगराध्यक्षा ममता पिपाडा यांचे चिरंजीव निखील यांचा एक आगळा-वेगळा विवाह सोहळा लासूर स्टेशन (जि. औरंगाबाद) येथे शनिवारी रात्री झाला.

अहमदनगर : गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांची कन्या श्रृती आणि राहाता येथील ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पिपाडा व नगराध्यक्षा ममता पिपाडा यांचे चिरंजीव निखील यांचा एक आगळा-वेगळा विवाह सोहळा लासूर स्टेशन (जि. औरंगाबाद) येथे शनिवारी रात्री झाला. पिपाडा यांचे कुटुंबीय सकाळी मुलगी बघायला गेले व सायंकाळी वधुलाच घरी घेऊन आले. कुठलाही बडेजाव न करता अत्यंत साधेपणाने व अवास्तव खर्चाला फाटा देत एकाच दिवसात व मोजक्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. श्रीमंत असलेल्या बंब आणि पिपाडा यांच्या या साधेपणाने मात्र सर्वांनाच जिंकले.राजेंद्र पिपाडा हे शनिवारी सकाळी कुटुंबियांसह मुलगी पाहण्यास गेले. तेथे मुलाला व कुटुंबियांना मुलगी पसंत पडली. त्यानंतर साखरपुडा, लग्न आदी चर्चा झाली. यावेळी आमदार बंब यांनी विवाह साधेपणाने आणि आजच करण्याचा प्रस्ताव पिपाडा यांच्यासमोर ठेवला. पिपाडा यांनी त्यांचे नातेवाईक व मित्रांशी चर्चा केली. त्यांनाही बंब यांचा प्रस्ताव आवडला. बंब यांनीही आहे त्या परिस्थितीत विवाह लावण्याची तयारी सुरू केली. दोघांनीही त्यांच्या मोजक्या नातेवाईक, आप्तेष्टांना विवाहाचे निमंत्रण दिले आणि शनिवारी लासूर स्टेशन येथील एका लॉनवर साध्या पद्धतीने विवाह पार पडला. विवाह समारंभात कोणताही बडेजाव नव्हता की पाहुण्यांची गर्दी.  अत्यंत साधेपणाने झालेल्या या विवाह सोहळ््याची चर्चा काही वेळातच सोशल मीडियावरही गेली. बंब-पिपाडा यांच्या या आदर्श पद्धतीचे उपस्थितांनी कौतुक केले. याचवेळी पिपाडा यांनी थेट माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या विवाहाची माहिती दिली. त्यांनी नवदाम्पत्यांना विवाहाच्या शुभेच्छा दिल्या. पिपाडा, बंब यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे व विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांना माहिती दिली. तेही जवळपास असल्याने त्यांनीही या साध्या पद्धतीने होत असलेल्या विवाह समारंभास हजेरी लावली. दोघांचेही त्यांनी कौतुक केले.  विशेष म्हणजे बंब हे स्वत: अनावश्यक खर्चाला फाटा देण्याचे आवाहन करतात. त्याचे अनुकरण स्वत: करूनही त्यांनी समाजासमोर आदर्श पायंडा पाडला आहे. भारतीय जैन संघटनेनेही या साधेपणाचे कौतुक करून समाजानेही आदर्श घेण्याचे आवाहन केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPrashant Bambप्रशांत बंबmarriageलग्न