शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
4
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
5
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
6
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
7
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
8
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
9
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
10
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
11
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
12
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
13
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
14
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
15
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
16
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
17
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
18
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
20
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग

By admin | Updated: May 16, 2016 00:10 IST

अहमदनगर : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी भाजप सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. सगळे कायदे पायदळी तुडवले जात आहेत.

अहमदनगर : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी भाजप सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. सगळे कायदे पायदळी तुडवले जात आहेत. असहिष्णुतेचा मुद्दा ते काही राज्यातील सरकार बरखास्त करण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. याची किंमत त्यांना दिल्ली, बिहारच्या निवडणुकीत मोजावी लागली. पुढील निवडणुकीत त्याचे परिणाम दिसणार आहेत. जिल्ह्यातील दुष्काळप्रश्नी तालुकानिहाय दुष्काळ परिषद घेणार असल्याची माहिती विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे यांनी दिली. राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत वळसे बोलत होते. ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, आ. संग्राम जगताप, आ. वैभव पिचड, आ. राहुल जगताप, महापौर अभिषेक कळमकर, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, कपिल पवार आदी यावेळी उपस्थित होते. वळसे यांच्याकडे नगर, जळगाव आणि नागपूर जिल्ह्याची पक्षीय संघटना वाढीची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे, त्यानिमित्त पहिली बैठक रविवारी नगरला झाली. वळसे म्हणाले, दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही. मराठवाड्याच्या बरोबरीने नगर जिल्ह्यात दुष्काळ आहे. यामुळे जिल्ह्यात तातडीने दुष्काळ उपाययोजना व्हाव्यात. ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी तालुकानिहाय दुष्काळ परिषद घेण्यात येणार असल्याचे सांगितले. मराठवाड्यातील लोकांचे रोजगारासाठी गुजरात, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकात स्थलांतर झालेले असून हे राज्य सरकारचे अपयश आहे. आगामी काळात तीन चतुर्थांश राज्यात पंचायत राज व्यवस्था आणि नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा विधायक मार्गाने प्रश्न सोडवण्याचा कल असतो. मात्र, त्यांनी आक्रमक होण्याची गरज आहे. पुण्यातून नगरच्या पाण्याची अडवणूक होत नसल्याचा दावा त्यांनी केला असून पाणी सोडण्याचा निर्णय त्या त्या वर्षी होणाऱ्या पावसावर अवलंबून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकार स्टिल उद्योगाला हजारो कोटींची सवलत देते. व्यापाऱ्यांची एलबीटी माफ करते, मग शेतकरी अडचणीत असताना त्यांना मदत का नको? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)दुष्काळप्रश्नी राष्ट्रवादीने केले सहा ठरावजिल्ह्यातील दुष्काळप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंदर्भात चार ठराव केले.राष्ट्रवादी भवनमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, आ. संग्राम जगताप, आ. वैभव पिचड, आ. राहुल जगताप, जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, महापौर अभिषेक कळमकर, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, कपिल पवार, प्रताप ढाकणे, सभापती नंदा वारे, शरद नवले, सिद्धार्थ मुरकुटे, दादा कळमकर, शारदा लगड, सोमनाथ धूत यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत कळमकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारने कांद्याला २५ रुपये किलो हमीभाव द्यावा, दुधाला २८ रुपये प्रतिलीटर भाव द्यावा,टँकर सुरू करण्याचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, असे विविध ठराव केले.