कोपरगाव : अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि.११ डिसेंबर ) संगमनेर येथे उत्तर नगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत कोपरगाव तालुक्याचा काँग्रेस पक्षाचा आढावा युवक जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे यांनी मांडला.
यावेळी कोपरगाव तालुक्यातून कोपरगाव शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील साळुंके, कार्याध्यक्ष मंगेश देशमुख, तालुका सरचिटणीस विष्णू पाडेकर, ज्ञानेश्वर भगत, शब्बीर शेख, महिला तालुकाध्यक्षा ॲड. शीतल देशमुख, महिला शहराध्यक्षा रेखा जगताप, तालुका सरचिटणीस सविता विधाते, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीजय चांदगुडे, कार्याध्यक्ष सागर बारहाते, युवक शहराध्यक्ष अक्षय आंग्रे, मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बागुल, शहराध्यक्ष रवींद्र साबळे, सचिव यादव त्रिभुवन, विद्यार्थी काँग्रेस जिल्हा सचिव निरंजन कुडेकर, विद्यार्थी शहराध्यक्ष आशपाक सय्यद, सोशल मीडिया प्रमुख दादा आवारे उपस्थित होते.