शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मोदींविरुद्ध पोस्ट; पोलीस निलंबित, संगमनेरमधील कॉन्स्टेबल : व्हॉटस् अ‍ॅपवर व्हायरल; माजी मंत्री थोरात यांचा अंगरक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 04:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचा आक्षेपार्ह मजकूर (पोस्ट) व्हॉटस् अ‍ॅपवर व्हायरल केल्याने, संगमनेरचे पोलीस कॉन्स्टेबल रमेश काळू शिंदे यांना निलंबित करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचा आक्षेपार्ह मजकूर (पोस्ट) व्हॉटस् अ‍ॅपवर व्हायरल केल्याने, संगमनेरचे पोलीस कॉन्स्टेबल रमेश काळू शिंदे यांना निलंबित करण्यात आले आहे. शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी ही कारवाई केली.सरकारी सेवकावर राज्यात प्रथमच अशा प्रकारची कारवाई झाली आहे. माजी मंत्री व काँग्रेसचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांचे रमेश शिंदे हे सध्या अंगरक्षक आहेत. थोरात मंत्री असल्यापासून ते त्यांचे अंगरक्षक आहेत. शिंदे यांनी नेमकी कोणती पोस्ट व्हायरल केली, याचा खुलासा पोलिसांनी केलेला नाही. संबंधित मजकूर अनेक ग्रुपवर व्हायरल झाल्याच्या तक्रारीनंतर सायबर विभागाने चौकशी केली. ही पोस्ट शिंदे यांच्या मोबाइलवरून व्हायरल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पंतप्रधान व संवैधानिक पदावरील व्यक्तींवर शासकीय सेवकाने जाहीर टिप्पणी करू नये, असा सेवानियम आहे.भाजपाच्या तक्रारीनंतर चौकशीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर, संगमनेरच्या भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी अशोक शिंदे, अ‍ॅड. गौरव मालपाणी, दीपेश ताटकर यांनी २२ सप्टेंबरला संगमनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.त्याची प्रत भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, पालकमंत्री प्रा.राम शिंदे, खा.दिलीप गांधी यांना देण्यात आली होती. त्यांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी वरिष्ठ पोलीस अधिका-यांकडे केली होती.

टॅग्स :PoliceपोलिसNarendra Modiनरेंद्र मोदी