शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बेलापुरातून व्यापारी बेपत्ता; अपहरणाची शक्यता, एका व्हॅनमधून पळवल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 10:55 IST

बेलापूर शहरातील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण (वय ५०) हे सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेपासून बेपत्ता झाले आहेत. बेलापुरातील आपल्या गोदामातून बाहेर पडल्यानंतर ते श्रीरामपूर शहरातील घराकडे निघाले होते. त्याचवेळी त्यांना एका व्हॅनमधून  बळजबरीने बसवून नेल्याचे काही प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. 

श्रीरामपूर : बेलापूर शहरातील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण (वय ५०) हे सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेपासून बेपत्ता झाले आहेत. बेलापुरातील आपल्या गोदामातून बाहेर पडल्यानंतर ते श्रीरामपूर शहरातील घराकडे निघाले होते. त्याचवेळी त्यांना एका व्हॅनमधून  बळजबरीने बसवून नेल्याचे काही प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. 

मंगळवारी सकाळी ११ वाजता बेलापूर व श्रीरामपूर येथील मर्चंट असोसिएशनने तातडीची बैठक बोलावली आहे. यात सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. याप्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याशी व्यापाऱ्यांनी संपर्क केला आहे. सायंकाळपर्यंत तातडीने हिरण यांचा शोध घ्यावा अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.

 हिरण यांची बेलापुरात एका नामांकित कंपनीची एजन्सी आहे. सोमवारी सायंकाळी गोदामातून बाहेर पडलेले हिरण घरी निघाले होते. मात्र त्याचवेळी एका व्यक्तीने कारचा बिघाड झाला असून हिरण यांच्याकडे मदतीची मागणी केली. या अज्ञात व्यक्तीने जॅकेट घातले असल्याचे काही लोकांनी सांगितले. हिरण यांनी एका मेकॅनिककडून कार दुरुस्तीसाठी साहित्य घेतले होते. ते कार दुरुस्ती करिता निघाले असता व्हॅनमध्ये त्यांना बसवले असे काही लोकांनी पाहिले.

   व्हॅनमध्ये बसलेली एक व्यक्ती सोडा सोडा म्हणत दरवाजाला लाथा मारत होती असे श्रीरामपूर-बेलापूर बायपासवरील काही लोकांनी पाहिली. ते वाहन श्रीरामपूरच्या दिशेने गेले. त्यामुळे ती व्यक्ती हिरण होती का? तसेच त्यांचे अपहरण झाले का? अशी चर्चा आहे.

    बेलापुरातील सीसीटीव्हीमध्ये ही व्हॅन दिसत आहे. मात्र क्रमांक त्यात दिसत नाही. त्यामुळे तपासाला अडचणी येत आहेत. या घटनेमुळे बेलापुरातील व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. हिरण यांची मोटरसायकल श्रीरामपूर-बेलापूर बायपासला उभी आहे. गाडीला चावी व कागतपत्रांची पिशवीही तशीच आहे.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरCrime Newsगुन्हेगारी