शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

भाकड जनावरांना मिळाला निवारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 04:38 IST

कत्तलखान्याकडे जाणारी मुकी जनावरे सोडवून त्यांचे संगोपन करण्याचे मोठे कार्य उज्ज्वल गोरक्षण संस्थेच्या माध्यमातून भर दुष्काळात संगमनेर तालुक्यातील मांचीहिलच्या उजाड माळरानावर सुरू आहे.

- योगेश रातडियाआश्वी (जि. अहमदनगर) : कत्तलखान्याकडे जाणारी मुकी जनावरे सोडवून त्यांचे संगोपन करण्याचे मोठे कार्य उज्ज्वल गोरक्षण संस्थेच्या माध्यमातून भर दुष्काळात संगमनेर तालुक्यातील मांचीहिलच्या उजाड माळरानावर सुरू आहे. या गो-शाळेत २४५ गायी, १६० कबुतर, २०० ससे ३ घोडे, ७ बदके अशी लहान, मोठ्या जनावरांना आधार मिळाला आहे.सुमारे वीस वर्षांपूर्वी जैन साध्वी, वाणीभूषण प्रीतीसुधाजी महाराज यांच्या प्रेरणेतून गो-शाळेची निर्मिती झाली. मुक्या प्राण्यांच्या संगोपनाची कल्पना उदयास आली होती. याच कालावधीत सिंधूताई सपकाळ यांनी सुरू केलेल्या अनाथ आश्रमातील जनावरांच्या गोठ्याला अचानक आग लागली होती. यामध्ये सात ते आठ गायी होरपळल्या होत्या. या सर्व जखमी गायींवर उपचार करून सांभाळ करण्याची जबाबदारी आश्वी (ता. संगमनेर) येथील प्रतिष्ठित व्यापारी दिवगंत स्वरुपचंद गांधी यांनी स्वीकारली. यातून प्रेरणा घेऊन मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अ‍ॅड. शाळीग्राम होडगर यांनी मांचीहिल येथील गो-शाळेसाठी दोन एकर जमीन दान दिली. जैन साध्वींचे आवाहन व शेकडो गोरक्षकांनी दिलेल्या दानातून गोरक्षक अमोलकचंद पारख यांच्या अध्यक्षतेखाली येथे गो-शाळेस प्रारंभ झाला. २० वर्षांत दीड हजार गायींना जीवदान दिले गेले. गोरक्षणाचे काम सुरू असताना संस्थेला आर्थिक अडचण निर्माण झाली. जैन साध्वी कैवल्यरत्नजी महाराज यांच्या प्रेरणेतून मुंबई येथील माता नाथीबाई दामोदर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुजितजी ठकरसी यांनी गोशाळेला ११ लाख ११ हजार १११ रुपये दिले आहेत. शासनाच्या मदतीविना कार्य सुरू आहे.मुक्या जनावरांच्या चारा व पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु जैन साध्वी कैवल्यरत्नश्रीजी महाराज यांचा आशीर्वाद व दानशूर व्यक्तीच्या पुढाकारातून गो-शाळेचे काम अविरत सुरू आहे. - सुमतीलाल गांधी,अध्यक्ष, जैन श्रावक संघ, आश्वी.उज्ज्वल गोरक्षण संस्थेच्या माध्यमातून दुष्काळात संगमनेर तालुक्यातील मांचीहिलच्या उजाड माळरानावर सुरू असलेल्या गो-शाळेतील जनावरे. येथे जनावरांना पुरेसा चारा-पाणी दिला जातो. त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्था व दाते मोकळ््या हाताने मदत करत असतात. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर