शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जामखेडमध्ये जनता कर्फ्यूबाबत राजकीय पक्षात मतभेद...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 13:13 IST

कोरोना प्रतिबंधासाठी तहसील कार्यालयात प्रशासन, व्यापारी व काही पक्ष संघटनेच्या वतीने पाच दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या जनता कर्फ्यूला राष्ट्रवादी काँग्रेस वगळता सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला होता. दरम्यान यातून शिवसेना, भाजपा, राष्टÑीय समाज पक्षाने आपल्याला याबाबत कोणी विश्वासात घेतले नसल्याने बंदमधून दूर राहणे पसंत केले आहे. आजच्या (१० आॅगस्ट) जनता कर्फ्यूला व्यापारी, व्यावसायिकांंनी ९० टक्के प्रतिसाद दिला आहे.

जामखेड : कोरोना प्रतिबंधासाठी तहसील कार्यालयात प्रशासन, व्यापारी व काही पक्ष संघटनेच्या वतीने पाच दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या जनता कर्फ्यूला राष्ट्रवादी काँग्रेस वगळता सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला होता. दरम्यान यातून शिवसेना, भाजपा, राष्टÑीय समाज पक्षाने आपल्याला याबाबत कोणी विश्वासात घेतले नसल्याने बंदमधून दूर राहणे पसंत केले आहे. आजच्या (१० आॅगस्ट) जनता कर्फ्यूला व्यापारी, व्यावसायिकांंनी ९० टक्के प्रतिसाद दिला आहे.

   जामखेड  तालुक्यात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. कोणीतरी दोन चार व्यापारी प्रशासनाबरोबर बैठक घेऊन पाच, सहा दिवसाचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतात. यात जनतेची कुचंबणा केली जाते.  लॉकडाऊन करण्यापेक्षा एखादे कोवीड सेंटर उभा करा. एखादे पेशंट नगरला गेले तर तेथे बेड शिल्लक नाही. ते येथे उपलब्ध करुन उपचाराचा मार्ग स्वीकारावा. कोरोना संदर्भात जनजागृती करा आणि कोरोनाबरोबर जगण्यासाठी लॉकडाऊन पर्याय नाही. संभाजी ब्रिगेड या गोष्टीचा निषेध करीत आहे. रविवारपासून होणारा लॉकडाऊन कोणी पाळू नये, असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांंनी केले आहे.

     वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरूण जाधव म्हणाले, महाराष्ट्रात कुठेही लॉकडाऊन नसताना काही व्यापारी एकत्र येऊन बळजबरीचा लॉकडाऊन करण्यास प्रशासनास भाग पाडतात. जनता कर्फ्यू म्हणून जाहीर करतात. यामुळे गोरगरीब नागरिक व छोट्या व्यवसायिकांचे हाल होतात. अगोदरच तीन महिने लॉकडाऊन झाल्याने जगणे मुश्किल झाले आहे. त्यात हा ५ दिवसाचा बंद जामखेडकरांना वेटीस धरणारा आहे. सर्व व्यापारी, व्यवसायिक व जनतेने उद्यापासून आपली दुकाने कोरोना नियमांचे पालन ठेवून चालू ठेवावीत, असे जाहीर केले.

     स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी व्यापा-यांनी बंद न पाळता शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले.

   जनता कर्फ्यूबाबत प्रशासन व व्यापारी यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. सध्या कोरोना रूग्ण वाढत आहेत. नगर येथे आॅक्सीजन मिळत नाही. त्यामुळे परिस्थिती गंभीर होत आहे. साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन गरजेचे आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष दत्तात्रय वारे यांनी सांगितले. 

जनता कर्फ्यूचा निर्णय व्यापारी व काही संघटना यांनी घेतला आहे. तो प्रशासनाचा निर्णय नाही. जे दुकाने उघडी राहतील. त्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले की नाही? याबाबत मुख्याधिकारी व आम्ही तपासणी करणार आहोत. जे दुकानदार नियम पाळणार नाहीत. त्यांच्यावर दंडात्मक व शासकीय मार्गदर्शनानुसार कारवाई केली जाणार आहे, असे तहसीलदार  विशाल नाईकवाडे यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याJamkhedजामखेड