अहमदनगर : दलित युवक नितीन साठे याच्या संशयित मृत्युप्रकरणी दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी व कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी,पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. धुमकेकर यांनी शनिवारपर्यंत (दि.१९) कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.ढोकले यांना सीआयडीच्या पथकाने बुधवारी दुपारी पुण्यातील त्यांच्या शेतातून अटक केली होती. सीआयडीचे पोलीस उपअधिक्षक बी. बी.थोरात यांनी ढोकले यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी सहायक अभियोक्ता अॅड. नितीन भिंगारदिवे यांनी बाजू मांडली. ढोकले हे सरकारी नोकर आणि पोलीस ठाण्यातील जबाबदार पदावर होते. असे असताना ते गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. साठेला मारहाणीत वापरलेली हत्यारे व बेडी आरोपीकडून जप्त करावयाची आहे.
पोलीस अधिकारी ढोकले कोठडीत
By admin | Updated: March 17, 2016 23:41 IST