शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पोलिसांनी पाठलाग करून वाळूचा डंपर पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 13:04 IST

उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या पथकाने संगमनेर तालुक्यातील नांदूर गावच्या शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पाठलाग करून पकडला. गुरुवारी रात्री साडेदहा वाजलेच्या सुमारास ही कारवाई केली. ४ ब्रास वाळूसह सुमारे ५ लाख १२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

घारगाव : उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या पथकाने संगमनेर तालुक्यातील नांदूर गावच्या शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पाठलाग करून पकडला. गुरुवारी रात्री साडेदहा वाजलेच्या सुमारास ही कारवाई केली. ४ ब्रास वाळूसह सुमारे ५ लाख १२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत खैरदरा परिसरात मुळा नदीपात्रातून एका शेतात वाळूची अवैध चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल बापूसाहेब हांडे, शांताराम मालुंजकर, शामराव हासे,आर.ए.लांघे, विशाल कर्पे यांंच्या पथकाने हा छापा टाकला. यात डंपर (क्रमांक एम.एच.-१७, बी.डी. ६८५५) हा वाळूची वाहतूक करून खैरदरा रस्त्याने जांबूतकडे जात असताना या पथकाने डंपरचा पाठलाग सुरू केला. चालकाच्या लक्षात येताच त्याने वाहनाची दिशा बदलवली. त्याने सुमारे चार ब्रास वाळू जांबूत-खैरदरा रस्त्यावर खाली करून पळ काढला. पथकाने नांदूर गावच्या शिवारात डंपरला पकडले. चौकशी दरम्यान वाळू वाहतुकीचा कोणताही शासकीय परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. सदर वाळू ही अजित मोरे (रा.खैरदरा जांबुत) यांच्या शेतातून आणल्याचे चालकाने पोलिसांना सांगितले. या कारवाईत चार ब्रास वाळूसह एकूण ५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चालक संकेत हरिभाऊ लामखडे (रा.केळेवाडी,बोटा,ता.संगमनेर) याच्यासह मालक संतोष तुळशीराम शेलार (रा.अकलापूर, ता.संगमनेर) यांच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस हेडकॉन्टेबल आर.ए.लांघे करीत आहेत.

टॅग्स :sandवाळूCrime Newsगुन्हेगारी