शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उसाला ३४०० रूपये भाव मागणा-या राहुरीतील शेतक-यांना पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 18:59 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी नगर-मनमाड महामार्गावर ऊस वाहतूक करणारी वाहने अडवून धरली. अधिका-यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची केलेली विनंती झिडकरल्याने सायंकाळपर्यंत आंदोलन सुरू होते. सायंकाळी कार्यकर्त्यांना राहुरी पोलिसांनी अटक केली आहे.

राहुरी : ‘ऊस आमच्या घामाचा, नाही कुणाच्या बापाचा’, उसाला ३४०० रूपये भाव मिळालाच पाहिजे, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा घोषणा देत राहुरी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी नगर-मनमाड महामार्गावर ऊस वाहतूक करणारी वाहने अडवून धरली. अधिका-यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची केलेली विनंती झिडकरल्याने सायंकाळपर्यंत आंदोलन सुरू होते. सायंकाळी कार्यकर्त्यांना राहुरी पोलिसांनी अटक केली आहे.राहुरी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शुक्रवारी सकाळी तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जमले. गुहा येथे नगर-मनमाड महामार्ग अडविण्याचा कार्यकर्त्यांनी अचानक निर्णय घेतला. सकाळी ११ वाजता कार्यकर्त्यांनी गुहा येथे जाऊन ऊस वाहतूक करणारी वाहने पुलावर अडविली. भाव जाहीर झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही़ आम्हाला अटक करा किंवा भाव जाहीर करा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली़नगरच्या प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातील प्रकाश सोनटक्के, प्रकाश सैंदाने, तहसीलदार अनिल दौंडे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळी जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. उसाचा उतारा व भाव यासंदर्भात साखर कारखान्यांशी संपर्क साधून माहिती घेतली जाईल़ आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन अधिका-यांनी केले. त्यावर कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही. आरपार लढाई असून अटक झाली तरी चालेल, पण आम्ही माघार घेणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोरे, प्रकाश देठे, सतीश पवार, अरूण डौले, भगिरथ पवार, राहुल करपे, दिनेश वराळे, अनिल इंगळे, असिफ पटेल, राजेंद्र शिंदे, तुषार शिंदे, विजय तोडमल, संदीप शिरसाट, प्रमोद पवार, रामकृष्ण जगताप, दिलावर पठाण आदी कार्यकर्ते सहभागी झाले.

अधिका-यांनी दिलेला शब्द पाळला नाहीजिल्हाधिक-यांशी चर्चेस बोलविले जाईल, असे आश्वासन प्रांताधिका-यांनी यापूर्वी दिले होते. प्रत्यक्षात ही बैठक तिनदा रद्द करण्यात आली. अधिका-यांनी दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून आम्ही रस्त्यावरून ऊस वाहतूक करणारी वाहने अडविली. साखर कारखानदार व अधिका-यांनी भावाबाबत कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने आम्ही आंदोलन मागे घेतले नाही. साखर कारखाने भाव जाहीर करीत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील.-रवींद्र मोरे, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राहुरी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी