शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना पोलिसांनी पाठलाग करुन पकडले; दोन जण फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 11:46 IST

नेवासा फाटा परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना रविवारी रात्री नेवासा पोलिसांनी पाठलाग करुन पकडले.  जॉकी रमेश चांदणे, राजू अजिज शेख, मुस्तफा गफुर बागवान (सर्व रा.नेवासा) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दरोड्याचा साहित्य जप्त केले असून दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत.

 नेवासा : नेवासा फाटा परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना रविवारी रात्री नेवासा पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. जॉकी रमेश चांदणे, राजू अजिज शेख, मुस्तफा गफुर बागवान (सर्व रा.नेवासा) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दरोड्याचा साहित्य जप्त केले असून दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत.नेवासा फाटा येथे रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक भारत दाते, पोलीस उपनिरीक्षक पी. के.शेवाळे, तपास पथकाचे विठ्ठल गायकवाड, तुळशीराम गीते, सुहास गायकवाड, राहुल यादव यांना रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास औरंगाबाद रोडवर पायल हॉटेलजवळ पाच इसम हातात लाकडी दांडके घेवून मोटारसायकलसह दरोडा टाकण्याचे उद्देशाने उभे असलेले दिसून आले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यामधील तीन इसमांना पकडले. बाकी दोन इसम हे अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. पकडलेल्या तिघांची विचारणा केली असता जॉकी रमेश चांदणे, राजू अजिज शेख, मुस्तफा गफूर बागवान (सर्व रा.नेवासा) अशी त्यांनी नावे सांगितले. पळून गेलेल्या दोघांबद्दल विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याजवळ असलेली यामा कंपनीची आर-१ मोटारसायकल (क्रमांक-एम.एच.-२०, एफ.सी.-८९९२) याबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या तिघांकडून लाकडी दांडके व जॉकी चांदणे याच्या पँटच्या खिशात मिरची पूड असे दरोडा टाकण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. पोलीस नाईक जयवंत तोडमल यांच्या फिर्यादीवरून पाच आरोपींविरोधात नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर