सुनील यशवंत रत्नापारखी (नेमणूक घारगाव पोलीस ठाणे, ता. संगमनेर) असे अटक केलेल्या पोलिसाचे नाव आहे. त्याच्याविरोधात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रत्नपारखी याची काही महिन्यांपूर्वी विवाह जुळविण्यासाठी असलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील एका घटस्फोटित महिलेशी ओळख झाली होती. रत्नपारखी याने या महिलेला लग्नाचे आमिष दाखविले. याकाळात ही महिला गरोदर राहिली. या पीडित महिलेचा दोनदा गर्भपात करण्यात आला. आळे येथील निरामय हॉस्पिटल येथे एकदा गर्भपात करण्यात आला. याप्रकरणी एकूण चार जणांवर गुन्हा दाखल केला असून यातील अमोल कजुर्ले याला यापूर्वी अटक केली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला डॉ. व्ही. जी. मेहेर (निरामय हॉस्पिटल, आळे, ता. जुन्नर, जि. पुणे) हा पसार झाला आहे.
अत्याचार करणाऱ्या पोलिसाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:16 IST