श्रीगोंदा : पीकअपमधील गायी चोरीच्या आहेत, असा देखावा करून तालुक्यातील चिखली येथील तरूणांनी हबीद जकाते, बाबु कुरेशी (रा. श्रीगोंदा) यांना बेदम मारहाण करुन २० हजारांची मागणी करण्यात आली. चिखली टोल नाक्यावर शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. आठ गायी असलेली पीकअप गंगापूरकडे चालली होती. चिखलीतील तरूणांनी चोरीच्या गायी आहेत, असा देखावा करून दोघांना मारहाण केली. व पीकअपमधील गायी खाली उतरवून घेतल्या. सेनेचे नंदकुमार ताडे मध्यस्थीसाठी गेले असता त्यांनाही दमदाटी करण्यात आली. ताडे यांनी बेलवंडी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस चिखलीत दाखल होण्यापूर्वीच पीकअॅप अडविणारे तरूणांनी काढता पाय घेतला. अरीफ कुरेशी यांनी गायी खरेदीच्या पावत्या दाखविल्यानंतर पोलिसांनी गायी कुरेशी यांच्या ताब्यात दिल्या. (तालुका प्रतिनिधी)
पीकअप अडवून दोघांना मारहाण
By admin | Updated: March 18, 2024 16:39 IST