शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान सिंचन योजना

By admin | Updated: October 8, 2014 00:09 IST

कोपरगाव : पाणी, रस्ते, बेरोजगारी या कोपरगाव तालुक्याच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी माझी आहे.

कोपरगाव : पाणी, रस्ते, बेरोजगारी या कोपरगाव तालुक्याच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी माझी आहे. तुम्ही केवळ स्नेहलता कोल्हे यांना आमदार करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले़ निळवंडे कालव्यासाठी केंद्र शासनाकडून निधी देवू व पाणीप्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी पंतप्रधान सिंचन योजना कार्यान्वित केली जाईल, अशी ग्वाहीही गडकरी यांनी दिली़कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा व मित्रपक्षाच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते़ यावेळी माजी मंत्री शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, भाजपाचे निरीक्षक खा़ वसंतभाई पटेल, ई़सी़ पटेल, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, कैलास जाधव, भरत मोरे, असलम शेख, भाजपाचे अ‍ॅड़ रवींद्र बोरावके, विजय वहाडणे, सुभाष दवंगे, महावीर दगडे, रिपाइंचे दीपक गायकवाड, रासपचे बाळासाहेब गिधाड, टेकचंद खुबानी आदी उपस्थित होते़ गडकरी म्हणाले की, गोदावरी कालव्यांचा बिकट झालेला पाणीप्रश्न, रस्ते, वीज, महिला बचतगट, महिला व ग्रामीण युवक रोजगार, शेती व कृषीमाल, आदिवासी, गोर-गरीब, मागासवर्गीयांचे प्रलंबित प्रश्न, महिलांवरील वाढते अत्याचार, नद्या जोड प्रकल्प, कोपरगाव शहर व मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांचे मांडलेले सर्व प्रश्न हे माझ्याकडे असलेल्या आठ खात्यांशी निगडीत आहेत. तेव्हा या सर्व प्रश्नांची सोडवणूक मी करणारच आहे़ मात्र त्यासाठी भाजपाला पूर्ण बहुमत देवून येथील उमेदवार कोल्हे यांना विजयी करावे लागणार आहे़ वर्षानुवर्षे केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्याला खाईत लोटले आहे़ गरिबी ही मोठी समस्या असताना चुकीचे आर्थिक धोरण, दृष्टीहीन नेतृत्व व भ्रष्ट प्रशासनामुळे देशाचा सत्यानाश झाला आहे़ राज्यावर तीन लाख कोटीचे कर्ज आहे़ तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ६० हजार कोटी रूपये खर्चाची प्रधानमंत्री सडक योजना राबविल्यामुळे देशातील एक लाख ६० हजार खेडी चांगल्या रस्त्याने जोडली गेली़ नरेंद्र मोदी यांच्या ध्येयानुसार जनधन योजनेत साडेचार कोटी खाते उघडले आहेत़ त्यांच्या डिजीटल इंडियाचे स्वप्न आपल्याला साकार करायचे असल्याचेही ते म्हणाले़उमेदवार कोल्हे म्हणाल्या, सेवेचे व विकासाचे राजकारण करणारी मंडळी हवी आहे़ राजकारण म्हणजे सत्ताकारण बनले आहे़ निष्क्रिय आमदारांमुळे भेसूर झालेल्या कोपरगावचा चेहरामोहरा मला बदलायचा आहे़ त्यासाठी मला विधानसभेत पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले़ (प्रतिनिधी)