शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
3
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
4
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
5
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
7
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
8
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
9
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
10
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
11
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
12
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
13
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
14
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
15
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
16
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
17
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
18
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
19
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
20
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव

स्नेहालय करणार नगरमध्ये वृक्षारोपण

By admin | Updated: June 17, 2016 23:37 IST

अहमदनगर : लोकसहभागातून वृक्ष संवर्धनाची चळवळ राबविण्याचे ‘लोकमत’ने जाहीर केल्यानंतर ‘ग्रीन अहमदनगर’साठी स्नेहालय व शिवरुद्रा बहुद्देशिय प्रतिष्ठानने वृक्षारोपण करण्याची तयारी शुक्रवारी दर्शविली़

अहमदनगर : लोकसहभागातून वृक्ष संवर्धनाची चळवळ राबविण्याचे ‘लोकमत’ने जाहीर केल्यानंतर ‘ग्रीन अहमदनगर’साठी स्नेहालय व शिवरुद्रा बहुद्देशिय प्रतिष्ठानने वृक्षारोपण करण्याची तयारी शुक्रवारी दर्शविली़ ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘माय सिटी माय ट्री’ अभियानाचे शहरासह जिल्हाभरातून स्वागत होत आहे़ लोकसहभागातून वृक्षारोपणाच्या चळवळीला मोठा प्रतिसाद मिळत आहे़ शहरासह जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था व प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात दूरध्वनीवरून वृक्षारोपण करून त्याचे जतन करण्याची इच्छा व्यक्त केली़ तारकपूर येथील सेंट झेव्हिअर्स स्कूलसह ग्रामीण भागातील आनंद मुसळे (काष्टी), हर्षवर्धन शेळके (गुंडेवाडी) , विजरेश्वरी (नगर), विकास झरेकर (कामरगाव), मौजे खानापूर ग्रामपंचायत (शेवगाव) आदी ग्रामस्थांनी अभियानात सहभाग नोंदविला़ त्यांनी वृक्षारोपण करून संवर्धन करणार असल्याचा संकल्प केला आहे़नगर शहरासह जिल्हाभरातून वृक्षारोपण करण्यासाठी शेकडो हात पुढे येत आहेत़ शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे, सामाजिक संस्था, सहकारी संस्था, मित्र मंडळांनीही वृक्षारोपणासाठी कार्यालयाकडे नोंदणी केली आहे़ ही नोंदणी सुरूच असून, सामाजिक संस्था, शाळा व्यवस्थापन, उद्योजक आदींनी अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे़(प्रतिनिधी)सहभागासाठी संपर्क विविध संस्थांना वृक्षारोपण करण्याची इच्छा आहे, त्यासाठी दाते हवे असून, अभियानात सहभागी होण्यासाठी कार्यालयात ९१७५५७५७५५ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा़ लोकमत कार्यालयास आपण प्रत्यक्ष भेट देवूनही या अभियानात काही जबाबदारी घेऊ शकता़