शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीच्या आराखड्यात साकळाईचा समावेश नाही; अहवाल तयार करण्याचे काम सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 12:32 IST

कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी २०१९-२० मध्ये ४० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. पंरतु त्यात श्रीगोंदा, नगर तालुक्यांसाठी वरदान ठरणा-या साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी तरतूद नाही़. तसेच या प्रकल्पात साकळाई योजनेचा समावेशही करण्यात आलेला नाही, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.

अहमदनगर : कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी २०१९-२० मध्ये ४० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. पंरतु त्यात श्रीगोंदा, नगर तालुक्यांसाठी वरदान ठरणा-या साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी तरतूद नाही़. तसेच या प्रकल्पात साकळाई योजनेचा समावेशही करण्यात आलेला नाही, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.आमदार बबनराव पाचपुते यांनी विधानसभेत कुकडी पाटबंधारे प्रकल्पात साकळाई उपसा सिंचन योजनेचा समावेश करण्यात आला आहे काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. पाचपुते यांच्या प्रश्नावर उत्तर देताना पाटील म्हणाले, कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी जलसंपदा विभागाच्या २०१८ च्या निर्णयानुसार सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यासाठी ३ हजार ९४८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याशिवाय कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी २०१९-२० मध्ये ४० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून डिंभे, माणिकडोह बोगद्याचे सर्र्वेक्षण व संकल्पन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे साकळाई योजनेसाठी तरतूद करण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले. समुद्राकडे जाणारे पाणी कुकडीत वळविणारकुकडी प्रकल्पापासून पश्चिम घाटमार्गे कोकणातून समुद्राकडे वाहून जाणारे पाणी कुकडी प्रकल्प व इंद्रायणी खो-यात वळविण्याच्या प्रस्तावास सरकारने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. नाशिक येथील मुख्य अभियंत्यांच्या पाणी उपलब्धता अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले. योजनेचा प्राथमिक अन्वेषण अहवाल तयार करुन त्यास मान्यता घेतल्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. क्षेत्रीय स्तरावर हे अहवाल तयार करण्याचे काम सुरु असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाDamधरणWaterपाणी