शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मोदी आणि कोतकरांची केडगावात एकत्र छायाचित्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 12:53 IST

नगरच्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी असलेल्या केडगाव उपनगरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कोतकर यांची छायाचित्रे सोबत झळकत आहेत.

अहमदनगर : नगरच्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी असलेल्या केडगाव उपनगरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कोतकर यांची छायाचित्रे सोबत झळकत आहेत. भाजपने आदेश दिल्यानंतरही कोतकर समर्थकांनी ही छायाचित्रे न हटविल्याने पक्षाची ऐन निवडणुकीत गोची झाली आहे. मुख्यमंत्री शुक्रवारी नगरला प्रचाराची सांगता करणार असून याबाबत ते काय भाष्य करणार? याची राजकीय गोटात उत्सुकता आहे.महापालिका निवडणुकीत भाजपने केडगाव या उपनगरात खुनाच्या गुन्ह्याखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कोतकर समर्थकांना एका रात्रीत पक्षात प्रवेश देऊन उमेदवाऱ्या दिल्या आहेत. ‘कोतकरांनी भाजपशी कायदेशीर सेटलमेंट केली आहे’ अशी टीका या प्रवेशाबाबत शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी केली आहे. ‘नरेंद्र मोदी व खुनाच्या गुन्ह्यातील कोतकर यांची छायाचित्रे सोबत शोभतात का?’ असाही आरोप सेनेने केला आहे. ‘मोदींसोबत कोतकरांचे फोटो लावू नका’, असा आदेश आम्ही पक्ष कार्यकर्त्यांना दिला असल्याची सारवासारव याबाबत खासदार दिलीप गांधी यांनी केली. मात्र, त्यानंतरही केडगावात ही दोन्ही छायाचित्रे घरोघर फिरत आहेत. शहरात सोशल मीडियावरही ही छायाचित्रे झळकली आहेत.त्यामुळेच कोतकर समर्थकांच्या भाजप प्रवेशाचे मुख्यमंत्री काय समर्थन करणार? की याबाबत ‘मौन’ बाळगणार? याची उत्सुकता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नगरला ३०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. मात्र, गत अडीच वर्षात निधी का दिला नाही? असा प्रश्न सेना व काँग्रेसने केला आहे.