शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगाव परिसरात घरफोड्या करणारे परप्रांतीय गुन्हेगार नागपुरात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 19:47 IST

कोपरगाव शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून धाडसी घरफोड्या करून चो-या करणा-या इंदोर (मध्यप्रदेश) मधील अट्टल गुन्हेगारास शहर पोलिसांनी नागपूर येथून अटक केली आहे.

कोपरगाव : शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून धाडसी घरफोड्या करून चो-या करणा-या इंदोर (मध्यप्रदेश) मधील अट्टल गुन्हेगारास शहर पोलिसांनी नागपूर येथून अटक केली आहे. त्याच्याकडून मारूती सुझुकी कंपनीच्या के-१० कारसह ८-९ लाखांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.एका चोरीच्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी संशयीत आरोपी पवन रामदास आर्य (वय ३१), रा. रामकृष्ण बाग कॉलनी पो. खजराना, जि. इंदोर यास अडीच लाख रूपये किमतीच्या पांढ-या रंगाच्या के-१० कार(क्रमांक एम.एच.१७, अ‍े.झेड. ९५५४) सह अटक केली. कारच्या नोंदणीवरून तेथील पोलिसांनी कोपरगाव पोलीस ठाण्यास कळविले. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार व उपाधीक्षक डॉ. सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी आरोपी आर्य यास नागपूर पोलिसांकडून स्थलांतर वॉरंटव्दारे अटक करून कोपरगावला आणले. अधिक चौकशी केल्यावर आरोपीने आपण मित्रासोबत शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनास आलो होतो. मात्र जाताना मित्राने आपल्याला साईनगरच्या फादरवाडी जवळ राहणारे एस.जी. विद्यालयाचे लिपीक राजकुमार काले यांच्या घरी घरफोडी करण्यास भाग पाडले. काले यांच्या घरातून १४ तोळे सोने, अर्धा किलो चांदीचे भांडे, अडीच लाखांची रोकड, २ टायटनची घड्याळे चोरली. तसेच २ डिसेंबर रोजी शहरातील शुभम नगरमधील अनंत चौधरी यांचे घर फोडून लाखो रुपयांचा ऐवज बाहेर उभ्या असलेल्या के-१० कारसह चोरून नेल्याची कबुली आरोपीने दिल्याचे जाधव यांनी सांगितले. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी ९० दिवसात तपास करून के-१० कारसह ८-९ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर.बी. भालेराव, कॉन्स्टेबल संभाजी शिंदे, अशिष मैंद हे करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावshirdiशिर्डी