शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
3
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
4
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
5
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
6
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
7
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
8
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
9
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
10
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
11
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
12
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
13
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
14
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

नगर शहरात ‘पे अ‍ॅन्ड पार्किंग’

By admin | Updated: March 29, 2016 23:41 IST

अहमदनगर : स्थायी समितीचे सभापती गणेश भोसले यांनी महापालिकेचा ७३३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापौर अभिषेक कळमकर यांना महासभेत मंगळवारी सादर केला.

अहमदनगर : स्थायी समितीचे सभापती गणेश भोसले यांनी महापालिकेचा ७३३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापौर अभिषेक कळमकर यांना महासभेत मंगळवारी सादर केला. शहरात यापुढे फुकटात पार्किंग बंद करण्यात येणार असून महापालिका ‘पे अ‍ॅन्ड पार्किंग’ सुरू करणार आहे. शहरात १० हजार नळजोड बोगस असून ते अधिकृत करून त्याद्वारे उत्पन्न वाढविण्यात येणार आहे. अपंग, कुष्ठरोगी व मनोरुग्णांना महापालिका दरमहा १ हजार रुपये अनुदान देणार असल्याची घोषणा सभापती भोसले यांनी सभागृहात केली. सभापती भोसले यांनी अर्थसंकल्प महासभेला सादर करण्यापूर्वी सभागृहात मनोगत व्यक्त केले. शहर विकासाची जबाबदारी आपल्या सगळ्यांची असल्याचे सांगत ‘जीआयएस’च्या माध्यमातून शहराचे सर्वेक्षण सुरू आहे. पन्नास टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यात साडेदहा हजार मालमत्ताधारकांची वाढ झाली आहे. संपूर्ण सर्वेक्षण झाल्यास महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. बोगस नळजोड शोधमोहिमेत शहरात १० हजार ६८० बोगस नळजोड मिळून आले आहेत. घरगुती पाणीपट्टीत वाढ न करता हे बोगस नळजोड नियमित करून महापालिकेला साडेतीन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल. शहरात रस्त्याच्याकडेला अनधिकृतपणे वाहने पार्किंग केली जातात. त्यापासून महापालिकेला काहीही उत्पन्न मिळत नाही. पार्किंगच्या जागेचा शोध घेऊन तेथे ‘पे अ‍ॅन्ड पार्क’ संकल्पना राबविली जाणार आहे. त्यातून महापालिकेचे उत्पन्न वाढणार आहे. विविध उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून तसेच कार्यक्षमतेने वसुली करून महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या शिफारसी स्थायी समितीने सूचविल्या असल्याचे भोसले यांनी सांगितले. ग्रीन सिटीची संकल्पना भोसले यांनी सभागृहात मांडली. शहरातील वृक्षांचे संरक्षण व जतन होण्याकरीता वृक्षगणना केली जाणार असून नव्याने वृक्ष लागवड केली जाणार आहे. याशिवाय वृक्ष लागवडीनंतर त्याचे पालकत्व दिले जाणार आहे. त्यांची नोंद महापालिकेत आॅनलाईन दिसणार आहे. उद्याने विकसित करण्यासाठीही भरीव तरतूद करण्यात आल्याचे भोसले यांनी सांगितले. पिंपळगाव माळवी येथील जागेत पर्यटन केंद्र विकसित करण्यात येणार आहे. रुग्णांचा प्रतिसाद मिळत नसलेले महापालिकेचे दवाखाने बंद केले जाणार असून आवश्यकता असलेल्या ठिकाणी ती नव्याने सुरू केली जाणार आहेत. दवाखान्यातील बाह्यरुग्ण शुल्कही माफ केले जाणार आहे. शहरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक, महात्मा फुले पुतळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याकरीता भरीव तरतूद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)तहकूब सभा बुधवारी७३३ कोटी रुपयांच्या (८ कोटी रुपयांचा शिलकी) अर्थसंकल्पाचा अभ्यास करण्यासाठी सदस्यांनी सभा तहकूब करून दोन दिवसांनी घेण्याची मागणी महापौरांकडे केली. मात्र, महापौर कळमकर यांनी अभ्यासासाठी सभा तहकूब करत बुधवारी सकाळी ११ वाजता सभा सुरू होणार असल्याचे सभागृहात जाहीर केले. अहमदनगर शहरात गणेश विसर्जन व मोहरम मिरवणूक मार्गावर तसेच महत्त्वाच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याची माहिती भोसले यांनी सभागृहात दिली. हा उपक्रम राबविल्याने महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीच्या घटना तसेच गुन्हेगारीला आळा बसेल, असा विश्वास भोसले यांनी व्यक्त केला. नगर शहरातील एक रस्ता मॉडेल म्हणून विकसित केला जाणार आहे. त्याची जबाबदारी उपायुक्त अजय चारठाणकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या रस्त्याची निवड करताना ती पारदर्शकपणे केली जाणार आहे. शहरात प्रथमच असा उपक्रम राबविण्यात येत आहे. नंतर त्या धर्तीवर शहरातील रस्ते विकसित केले जाणार आहेत.