अहमदनगर : अहमदनगर महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपाला पाठींबा दिलेल्या नगरसेवकांवर कारवाईंची टांगती तलवार आहे. आज मुंबईत झालेल्या बैठकित प्रदेशाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यावर कारवाईची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी भाजपाला पाठींबा दिला. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांनी कारवाई करण्याचे संकेत दिले होते. आज मुबंईत राष्ट्रवादीची बैठक झाली. या बैठकित बंडखोर नगरसेवकांवर कारवाई करण्याचे अधिकारी जयंत पाटील यांच्यावर यांना देण्यात आले आहेत.
राष्ट्रवादीच्या बंडखोर नगरसेवकांवर कारवाईची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 18:10 IST