शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणबाळ पूर्ण करणार आई-वडिलांची इच्छा; खास हेलिकॉप्टरने काशीला रवाना होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 03:32 IST

१०४ वर्षांचे आजोबा ९५ वर्षांच्या आजींसह खास हेलिकॉप्टरने रवाना होणार

चंद्रकांत शेळके अहमदनगर : एकीकडे वृद्ध आई-वडिलांना अनाथाश्रमाची वाट दाखवली जात असली तरी भारतीय समाजात श्रावणबाळदेखील काही कमी नाहीत. शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथील वैद्य बंधूही त्यापैकीच एक. त्यांच्या आई-वडिलांची इच्छा आहे की उर्वरित आयुष्य काशीला घालवून देह तेथेच ठेवावा. त्यामुळे गावाला, नातेवाईकांना कायमचा निरोप देऊन या वृद्ध दाम्पत्याला काशीला नेण्याची सोय वैद्य बंधूंनी केली आहे. येत्या १६ जून रोजी हे दाम्पत्य खास हेलिकॉप्टरने काशीला रवाना होणार आहे.

शिवलिंग वैद्य (वय १०४) व सीता वैद्य (वय ९५) असे या वृद्ध दाम्पत्याचे नाव. त्यांना सीताराम (वय ६८), सुभाष (वय ६५), महालिंग (वय ६२) व मंदाकिनी (वय ५८) अशी चार मुले. शेती करून त्यांनी मुलांना वाढवले. मोठे चिरंजीव सीताराम हे रेल्वेत, तर सुभाष वैद्य हे रिझर्व्ह बँकेत नोकरीस होते, तर लहान मुलगा महालिंग यांनी गावाकडे शेती सांभाळली.

वारकरी वारसा असल्याने शिवलिंग यांनी महिन्याला एकदा पैठण आणि दोनदा पंढरपूर कधी चुकवलं नाही. मुलांनी संपूर्ण भारतातील तीर्थक्षेत्रे दाखवली. ज्ञानेश्वरीची पारायणे इतकी झालीत की ती आता पाठ झाली आहेत. आयुष्याचे शेवटचे दिवस काशी विश्वेश्वराच्या साधनेत घालवायचे आणि तेथेच देह ठेवायचा, अशी इच्छा शिवलिंग यांनी मुलांना बोलून दाखवली. जन्मभूमी सोडून दुसरीकडेजायचं आणि तेही कधी परत न येण्यासाठी, यावर नातेवाईकांचा, ग्रामस्थांचा विश्वास बसेना. परंतु शिवलिंग दाम्पत्य निर्णयावरठाम आहेत. त्यामुळे मुलांनीही आई-वडिलांची ही इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले.हेलिकॉप्टरसाठी १४ लाखांचा खर्चशहरटाकळी येथे यानिमित्त वैद्य बंधूंनी आई-वडिलांचा भव्य निरोप समारंभ आयोजित केला आहे. १६ जून रोजी भव्य मिरवणुकीने शिवलिंग व त्यांची पत्नी सीताबाई यांना निरोप देण्यात येणार आहे. वैद्य दाम्पत्य शहरटाकळी येथून खास हेलिकॉप्टरने मुंबई वतेथून विमानाने काशीला जाणार आहेत. हेलिकॉप्टरसाठी १४ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. काशीला राहण्यासाठी त्यांनीएक खोली घेतली असून आता या दाम्पत्याची अखेरही काशीतच होणार आहे.