अहमदनगर : गतवर्षीपासून शाळा बंद असल्याने रिक्षा व स्कूल व्हॅनचालकांवरही मोठे संकट आले आहे. त्यांचा रोजगार बंद झाल्याने अनेकांना उपासमार सहन करावी लागत आहे. यावर पर्याय म्हणून ऑक्झिलिअम शाळेतील पालकांनी एकत्र येत रिक्षाचालकांना किराणा साहित्याचे वाटप केले.
पालकांनी ऑनलाइन पद्धतीने मदतीचे आवाहन केले. त्यातून जमा झालेल्या मदतीतून २८ रिक्षाचालकांना किराणा साहित्य वाटप करण्यात आले.
या मदतीमुळे रिक्षाचालकही भारावून गेले. शाळेच्या व्यवस्थापक सिस्टर रिता लोबो, प्रिन्सिपल सिस्टर लता आरोग्य स्वामी, पर्यवेक्षिका सिस्टर नीलिमा, गोविंद कांडेकर यांचे उपस्थितीत रिक्षाचालकांना ही मदत देण्यात आली. या उपक्रमासाठी डॉ.सुरेश पठारे, सुधीर लंके, डॉ.रणजीत सत्रे, ॲड. विक्रम वाडेकर, नवजीवन प्रतिष्ठानचे राजेंद्र पवार, डॉ.बापूसाहेब नागरगोजे, सचिन राणे, किरण काळे, अविनाश चारगुंडी, सचिन काकड, ॲड.पंकज खराडे, जफर शेख आदी पालकांनी पुढाकार घेतला.
......................
सर्व शाळांतील पालकांनी असा उपक्रम हाती घ्यावा
रिक्षाचालकांचे प्रतिनिधी प्रकाश गोसावी, अशोक औटी, रामुकाका चारगुंडी यांनी या मदतीबद्दल बोलताना सांगितले, ‘गत वर्षापासून रिक्षा चालक संकटात आहेत. त्यांच्या कामाची जाणीव ठेवत पालकांनी मदत दिल्याने आम्हाला माणुसकीचे दर्शन घडले आहे. सर्व शाळेतील पालकांनी असा उपक्रम राबविल्यास अनेक रिक्षा चालकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल'.
...........
१६ रिक्षा मदत