शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

पालकांची पसंती जिल्हा परिषद शाळांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 13:00 IST

खासगी शैक्षणिक संस्थांचे पेव फुटले असले तरी पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळांनाच प्राधान्य दिले आहे. पहिल्या चार दिवसांतच जिल्हा परिषदेच्या शाळेत नवीन तीस हजार मुले दाखल झाले आहेत.

अहमदनगर : खासगी शैक्षणिक संस्थांचे पेव फुटले असले तरी पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळांनाच प्राधान्य दिले आहे. पहिल्या चार दिवसांतच जिल्हा परिषदेच्या शाळेत नवीन तीस हजार मुले दाखल झाले आहेत. पुढील आठवड्यात पटसंख्या आणखी वाढेल, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे. उन्हाळी सुटीत दाखलपात्र मुलांचे दरवर्षी सर्वेक्षण होत असते़ परंतु, जिल्हा परिषदेच्या सर्व गुरुजींना बदल्यांचे वेध लागले होते.  त्यामुळे पालक भेटी झाल्या नाहीत. त्यामुळे यंदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या पटसंख्येत घट होईल, असा अंदाज शिक्षण विभागाने बांधला होता. मात्र शहरासह जिल्ह्यातील पालकांनी आपल्या पाल्याला जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करत शिक्षण विभागाचा अंदाज मोडीत काढला. जिल्हा परिषदेच्या शाळा शुक्रवारी सुरू झाल्या़ बुधवारी शाळेचा चौथा दिवस होता़ पहिलीच्या वर्गात गेल्या चार दिवसांत नव्याने दाखल झालेल्या मुलांची आकडेवारी शाळांकडून प्राप्त झाली आहे. खासगी शाळांची विद्यार्थी मिळविण्यासाठी धावपळपहिलीच्या वर्गात ३० हजार ९६७ नवीन मुले दाखल झाली आहेत़ जिल्ह्यातील दाखल पात्र मुलांची आकडेवारी पाहता जिल्हा परिषदेच्या शाळाच सरस ठरल्या आहेत़ शहरी व ग्रामीण भागांतील पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळांना प्राधान्य दिल्याने खासगी शाळांना मुले मिळविण्यासाठी धावपळ करावी लागली़ शहरात ४ हजार ८०० दाखल मुलांपैकी ४ हजार ५०० मुलांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे़राहुरीत साडेनऊशे मुलेजिल्ह्यातील दाखल पात्र मुलांची यादी शाळांनी जाहीर केली आहे़ जिल्ह्यात ३१ मे २०१८ रोजी सहा वर्षे पूर्ण झालेल्या मुलांची संख्या ४५ हजार ४६९ ऐवढी आहे़ त्यापैकी ३० हजार मुलांनी जिल्हा परिषदेच्या शाळेची वाट धरली आहे़ राहुरी तालुक्यातील २ हजार २१८ दाखल पात्र मुलांपैकी अवघी साडेनऊशे मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाली आहेत़७० टक्के मुले जि़ प़ शाळेतसंगमनेर व नेवासा तालुक्यांत सर्वाधिक चार हजारांहून अधिक दाखल पात्र मुले आहेत़ त्यापैकी संगमनेर तालुक्यातील ३ हजार, तर नेवासा तालुक्यातील ७० टक्के मुलांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला पसंती दिली आहे़शहरातील तीनशे मुले खासगी शाळेत?नगर शहरात दाखल पात्र मुलांचे सर्वेक्षण महापालिकेच्या शिक्षण मंडळाने केले़ यानुसार नगर शहरात ४ हजार ५०० मुलांना ३१ मे २०१८ रोजी सहा वर्षे पूर्ण झालेली आहेत़ त्यापैकी ४ हजार ५०० मुले पालिकेच्या शाळेत दाखल झाल्याचा दावा शिक्षण मंडळाने केला आहे़ याचा अर्थ शहरातील ३०० मुलेच खासगी शाळेत दाखल झाले असा होतो़ पालिकेच्या अहवालाने शिक्षण विभागासह सर्वच अवाक् झाले़मुले मिळविण्यासाठी ग्रामीण भागात सुरू असलेल्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळांनी बाजी मारली आहे़ जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिलीच्या वर्गात दाखल मुलांची तालुकानिहाय संख्या पुढीप्रमाणे-

अकोले- १ हजार ४६७संगमनेर-३ हजार १०८नेवासा-२ हजार ८१४राहाता-२ हजार १३कोपरगाव-१ हजार ९२३श्रीरामपूर-१ हजार १६१शेवगाव-२ हजार ९१जामखेड-१ हजार २७५कर्जत-२ हजार ३४९पाथर्डी-१ हजार ७४९श्रीगोंदा-२ हजार ९१राहुरी-९५५नगर-२ हजार ११२पारनेर-१ हजार ७७७

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद