कोरोना काळात शाळा अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शाळेचा परिसर अस्वच्छ झाला होता. गवत, झुडपे वाढली होती.
मंगळवारी (दि.१०) शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत अध्यापन व शाळा विकास याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, पालकांनी लागलीच स्वच्छता मोहीम हाती घेऊन परिसर स्वच्छ केला. कचरा उचलण्यासाठी ट्रॅक्टर अनिल वने यांनी उपलब्ध करून दिला. स्वच्छता मोहीम कामात शाळेचे शिक्षक मल्हारी शिरसाठ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश हापसे, समिती सदस्य सोमनाथ सखाहरी तारडे, रवींद्र बाळासाहेब वने, प्रशांत दिनकर बानकर, मिनीनाथ पाटीलबा वने, किशोर गेणू वने, सुधाकर ज्ञानदेव वने यांनी सहभागी होत स्वच्छता केली. वीज दुरुस्तीसाठी वायरमन सतीश बानकर यांनी सहकार्य केले.