शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांना दरवाढ न मिळाल्यास कोयता बंदच :पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 12:51 IST

दसऱ्यापूर्वी ऊसतोडणी कामगारांसाठी महामंडळ अस्तित्वात येऊन मजुरांना भाववाढ दिली जाईल, अन्यथा कोयता बंद आंदोलन केले जाईल.

पाथर्डी : दसऱ्यापूर्वी ऊसतोडणी कामगारांसाठी महामंडळ अस्तित्वात येऊन मजुरांना भाववाढ दिली जाईल, अन्यथा कोयता बंद आंदोलन केले जाईल. ऊसतोडणी कामगारांसाठी दस-यापूर्वी महामंडळ अस्तित्वात येण्यासाठी ऊसतोडणी कामगार संघटनेच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ऊसतोडणी कामगारांना आरोग्य, शिक्षण, कर्ज, विमा, घर मिळाले पाहिजे. यासाठी कामगारमंत्र्यांना आदेश द्या, असे सांगितल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी खरवंडी कासार येथील ऊसतोडणी कामगार मेळाव्यात स्पष्ट केले.आमदार मोनिका राजळे अध्यक्षस्थानी होत्या. मुंडे म्हणाल्या, मजुरांचा दरवाढीसंदर्भात पाच वर्षांचा करार कधीच झाला नव्हता. मात्र ज्यावेळी पाच वर्षांचा करार केला, त्यावेळी साखरेचा दर प्रति क्विंटल १९०० रूपयांपर्यंत कोसळल्याने कारखानदारी अडचणीत होती. आपला ऊस तोडणी कामगार कर्नाटककडे स्थलांतरित होत होता. साखर कारखाने टिकावेत, म्हणून पाच वर्षांचा करार करण्यात आला. मात्र त्यावेळी साखरेला भाव वाढल्यावर मजुरांची देखील मजुरी वाढवावी लागेल, असा आग्रह धरला होता. त्यामुळे साखरेला भाववाढ झाल्याने मजुरीही वाढली पाहिजे. त्यासाठी दोन दिवसानंतर लवादाची बैठक होणार आहे. मजुरी दरवाढीचा निर्णय झाला नाही तर कोयता बंद आंदोलन केले जाईल.खासदार दिलीप गांधी, प्रितम मुंडे, आमदार भीमराव धोंडे, सुरेश धस, माजी आमदार गोविंद केंद्रे, केशव आंधळे, विजय गोल्हार, पंचायत समिती सभापती चंद्रकला खेडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन शिरसाठ, सोमनाथ खेडकर, रामराव खेडकर, मोहनराव पालवे, नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे,राहुल कारखेले, गोपीनाथ मुंडे ऊसतोड मुकादम वाहतूक संघटनेचे पिराजी किर्तने, अशोक खरमाटे, आलमगीर पठाण, भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, संजय किर्तने, अशोक चोरमले,धनंजय बडे, अरूण मुंडे, बाळासाहेब ढाकणे, बापूसाहेब पाटेकर, शेवगाव उपनगराध्यक्ष वजीर पठाण,काशीबाई गोल्हार,सुरेखा ढाकणे,मनीषा घुले आदी उपस्थित होते.मुंडे यांचा ऊसतोड मजूर संघटनेतर्फे उसाची मोळी व कोयता भेट देऊन सत्कार करण्यात आला. करोडी येथील विनाअनुदानित भारतमाता प्रतिष्ठानच्या आश्रमशाळेला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे मुंडे यांच्या हस्ते एक लाखाची देणगी दिली. एक वाजेची सभा चार वाजता सुरू होऊनही मोठ्या संख्येने ऊसतोड कामगार, मुकादम, महिला मोठ्या संख्येनेउपस्थितहोते. संपत किर्तने यांनी प्रास्तविक केले. राजीव सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. संजय कीर्तने यांनी आभार मानले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPankaja Mundeपंकजा मुंडे