शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Raksha Bandhan: पद्मश्री राहीबाई यांनी पाठवली मंञी चंद्रकांतदादा यांना बीज राखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 15:48 IST

Raksha Bandhan: अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील गावरान बियाणे संवर्धन करणार्‍या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी बी बियाणे यांचे पासून बनवलेली बीज राखी सोमवारी मंञीपदाची शपथ घेतलेल्या आपल्या मानलेल्या भावास, मंञी चंद्रकांत पाटील,  बच्चू कडू  यांना पाठवली आहे.

- हेमंत आवारी अहमदनगर - अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील गावरान बियाणे संवर्धन करणार्‍या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी बी बियाणे यांचे पासून बनवलेली बीज राखी सोमवारी मंञीपदाची शपथ घेतलेल्या आपल्या मानलेल्या भावास, मंञी चंद्रकांत पाटील,  बच्चू कडू  यांना पाठवली आहे.

गत युती शासनात चंद्रकांत पाटील हे महसूल मंञी असताना त्यांच्या माध्यमातून कर्तव्य प्रतिष्ठानच्या वतीने राहीबाई यांना बीज बँकेसाठी ४६ लाखाचे  चौमोळी चिरेबंदी पक्के घर ३६ दिवसात बांधून दिले. ही भेट सुपूर्त करण्यासाठी मंञी पाटील हेलीकॉप्टरने ३ मार्च २०१९ ला कोंभाळणे येथे आले होते. या आठवणींना उजाळा देतानाच मंञी पाटील यांनी मंगळवारी मंञीपदाची शपथ घेण्यापूर्वी पद्मश्री राहीबाई यांनी  त्यांना बीज राखी पाठवली.

सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊ राया रे वेड्या बहिणीची रे वेडी माया ! या मराठी गीताची आठवण, बहीण भावाच्या नात्याची आपुलकी आणि माया आपल्या डोळ्यासमोर येते. पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी आपल्या भावासाठी म्हणजेच चंद्रकांत दादा पाटील यांच्यासाठी बीज राखी बनवून एक अनोखी व जगावेगळी भेट आपल्या भावाला दिलेली आहे. भात, नागली, वरई, काकडी, भोपळा यासारख्या अनेक प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून त्यांनी या राख्या स्वतःच्या हाताने बनवलेले आहेत. राहीबाई यांच्या वात्सल्य आणि प्रेमापोटी हजारो शेतकरी त्यांना आपली बहीण मानतात. या शेतकऱ्यांचा राखण्यासाठी त्यांनी या बीज राख्यांची निर्मिती केली आहे. त्याचप्रमाणे  देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या प्रती प्रेम आणि आदर भावना मनामध्ये ठेवून एक धागा राष्ट्रबांधणीचा या विचारांना पुढे नेण्यासाठी त्यांनी या राख्या बनवल्याचे सांगितले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरchandrakant patilचंद्रकांत पाटीलRaksha Bandhanरक्षाबंधन