शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

राहुरीत एटीएम फोडून १५ लाख लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 13:48 IST

राहुरी : येथील बस स्थानकासमोरील स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी सोमवारी पहाटे सुमारे १५ लाख रुपये लांबविल्याची घटना घडली. विशेष ...

राहुरी : येथील बस स्थानकासमोरील स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी सोमवारी पहाटे सुमारे १५ लाख रुपये लांबविल्याची घटना घडली. विशेष म्हणजे या एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नेमलेला नव्हता़ तसेच एटीएममध्ये सीसीटीव्ही बसविलेला नाही.रविवारी पहाटे याच बस स्थानकाशेजारील आईस्क्रीमच्या दुकानाबाहेरील सीसीटीव्ही चोरट्यांनी काढून नेला होता. एटीएमची पाहणी करुन चोरटे त्यादिवशी निघून गेले. सोमवारी ते चोरटे पुन्हा आले़ त्यांनी नगर-मनमाड रोडवर चारचाकी कार लावली़ तेथून चोरटे पायी बसस्थानकावर आले. समोरच असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएममध्ये चोरटे घुसले़ हे एटीएम चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने कापले. आतील पैशाचा ट्रे घेऊन चोरटे पसार झाले. हे एटीएम कापतात ते शॉर्टसर्कीटमुळे जळाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या एटीएममध्ये सुमारे १५ लाख रुपये रक्कम असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.दरम्यान या एटीएमपासूनच काही अंतरावर असलेल्या हॉटेलच्या कॅमेºयात हे चोरटे कैद झाले आहेत. त्यात चोरटे १ वाजून ३६ मिनिटांनी राहुरीतील नगर-मनमाड रस्त्यावर कार लावताना दिसत आहेत. कारमध्ये एक ड्रायव्हर बसलेला दिसत असून, इतर तिघेजण एटीएमच्या दिशेने येतात दिसतात. त्यांच्या हातात कटरसारखे काहीतरी असल्याचे दिसते. मात्र, सीसीटीव्ही व चोरट्यांमधील अंतर जास्त असल्यामुळे या सीसीटीव्हीत चोरट्यांचे चेहरे स्पष्टपणे ओळखू येत नाहीत, असे पोलिसांनी सांगितले़ घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधीकारी अरुण जगताप, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक एल टी भोसले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली़ श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते़ मात्र, श्वान पथकाला चोरट्यांचा माग काढता आला नाही.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरatmएटीएम