शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महसूलमंत्र्यांच्या गावातच सदस्यातून सरपंच निवडीला विरोध; थेट जनतेतून सरपंच निवडीस जोर्वे ग्रामस्थांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 16:15 IST

जनतेतून सरपंच निवडण्याचा कायदा कायम ठेवावा, अशा मागणीचा ठराव कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावच्या ग्रामसभेत करण्यात आला. हा ठराव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आला आहे.

संगमनेर : महाविकास आघाडी सरकारने थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड रद्द केल्यानंतर सरपंच निवडही रद्द केली. त्यामुळे आता ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवडला जाणार आहे. मात्र, जनतेतून सरपंच निवडण्याचा कायदा कायम ठेवावा, अशा मागणीचा ठराव कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावच्या ग्रामसभेत करण्यात आला. हा ठराव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आला आहे.    गुरूवारी (६ फेबु्रवारी) जोर्वे ग्रामपंचायतीची ग्रामसभा झाली. या ग्रामसभेत करण्यात आलेल्या महत्वपूर्ण ठरावांपैकी सरपंच निवडीच्या विषयाचा ठरावही प्राधान्याने चर्चेत आणला गेला. ग्रामसभेत बाबासाहेब रघुनाथ इंगळे यांनी थेट जनतेतून सरपंच निवडण्याची प्रक्रिया कायम ठेवण्याचा ठराव मांडला. त्यास हरिष एकनाथ जोर्वेकर यांच्यासह आदींनी अनुमोदन देवून पाठिंबा दिला. मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदनाची प्रत ठरावासह पाठविण्यात आली आहे.पंचायतराज व्यवस्थेत ग्रामपंचायत ही लोकशाहीचा पाया भक्कम करणारी व्यवस्था आहे. या शासकीय व्यवस्थेतून विधीमंडळ व संसदेच्या सभागृहात प्रतिनिधीत्व करणारी मंडळी तयार झाली. पूर्वी ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर निवड झालेल्या सदस्यांमधून सरपंच निवड होत असे. मात्र, या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात होत असलेली आर्थिक उलाढाल, सदस्यांची होणारी पळवापळवी आणि दमदाटी यातून वाढलेल्या गुन्हेगारीला निर्बंध घालण्यासाठी युती सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडीचा कायदा केला होता. परंतू आता महाविकास आघाडी सरकारने थेट जनतेतून सरपंच निवड प्रक्रिया बंद करुन पुन्हा सदस्यांमधून सरपंच निवड प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यास मदत होईल. वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे विपरीत परिणाम विकास कामांवरही होईल, अशी भीती या ठरावात व्यक्त केली आहे. जनतेतूनच थेट सरपंच निवडण्याचा कायदा पुन्हा लागू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.केंद्राच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याचे स्वागत    केंद्र सरकारने लागू केलेल्या भारतीय नागरिकत्व सुधारणा कायद्याचे ग्रामसभेत स्वागत केले आहे. या कायद्याला पाठिंबा देण्यात आला. जोर्वे गावच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वाळू उपशामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली आहे. शेतीलाही पाणी कमी पडू लागल्याने जोर्वे गावात कृत्रीम पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेवून तसेच वाळू माफियांच्या वाढत्या मुजोरीला पायबंद घालावा, यासाठी ग्रामसभेत सर्वानुमते जोर्वे हद्दीतील नदीपात्रातून होणारा बेकायदेशीर वाळू उपसा बंद करण्याचा ठरावही करण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातsarpanchसरपंच