अहमदनगर : सरकारच्या वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सरकारचा निषेध करत महागाई कमी करण्याची मागणी करण्यात आली.शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी महागाईच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
महागाईच्या विरोधात शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 13:17 IST