शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
2
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
3
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
4
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
5
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
6
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
7
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
8
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
9
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
10
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
11
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
12
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
13
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
14
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
15
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
16
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
17
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
18
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
19
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
20
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?

शेतकरी कर्जमाफीसाठी आदिवासींचे ५०० कोटी देण्यास पिचडांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 20:35 IST

‘लोकमत’ने याबाबत मंगळवार ३१ आॅक्टोबरला ‘मागासवर्गीय, आदिवासींचा निधी कर्जमाफीसाठी वळविला’या मथळ्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पिचड यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे.

अहमदनगर : शेतकरी कर्जमाफीसाठी आदिवासी विभागाचे ५०० कोटी रूपये वळविण्यास माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आदिवासी विभागाचा निधी कर्जमाफीसाठी वळविण्याचा निर्णय रद्द करण्याची आग्रही मागणी केली आहे.‘लोकमत’ने याबाबत मंगळवार ३१ आॅक्टोबरला ‘मागासवर्गीय, आदिवासींचा निधी कर्जमाफीसाठी वळविला’या मथळ्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पिचड यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे. राज्याच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातून आदिवासी समाजास न्याय मिळत नाही. त्यामुळे आदिवासींची लोकसंख्या व क्षेत्रफळ याआधारे आदिवासींसाठी वेगळा ९ टक्के निधी टी. एस. पी. व ओ. टी. एस. पी. क्षेत्रासाठी राखीव ठेवला जातो. आतापर्यंत हा निधी इतरत्र वळविण्यात आला नाही. मात्रा आता कर्जमाफीसाठी ५०० कोटी रूपये निधी वळविण्यात आला आहे.राज्यातील किती आदिवासी शेतकरी कर्जबाजारी आहेत, याचा ठोस आकडा उपलब्ध नसताना राज्याच्या कर्जमाफीसाठी निधी गोळा करताना त्याची झळ आदिवासी लोकांना का लावण्यात आली. अजूनही आदिवासी क्षेत्रात दळणवळण, शिक्षण, आरोग्य, पोषण, शेती,रोजगार व सिंचन आदी सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात इतर क्षेत्रापेक्षा मोठा अनुशेष आहे. अजूनही आदिवासी व दुर्गम भागात कुपोषणाची व बालमृत्यूची समस्या आहे. त्याच्या निर्मूलनासाठी जादा निधीची गरज असताना त्यांच्या अर्थसंकल्पातून ५०० कोटी रुपये कर्जमाफीसाठी घेणे न्याय ठरणार नाही. त्यामुळे हा निर्णय त्वरित रद्द करावा,असेही या पत्रात पिचडांनी म्हटले आहे.

जिल्हास्तरावर ३० टक्के कपात

राज्यावरील कर्जभारामुळे जिल्हास्तरीय व प्रकल्प आदिवासी क्षेत्रातील विकासासाठी दिलेल्या निधीत ३० टक्के कपात केली आहे. त्यामुळे आदिवासी भागातील विकासाला खीळ बसणार आहे. या कपातीमुळे आदिवासी क्षेत्रात अनेक काम बंद होऊन आदिवासी व्यक्ती व सामूहिक विकासाला खीळ बसणार आहे. कपातीमुळे आदिवासी समाजावर मोठा अन्याय होत आहे. तसेच कर्जमाफीसाठी आदिवासी विभागाचे ५०० कोटी रूपये वर्ग केले आहेत. आदिवासी उपयोजनेतून असा अतिरिक्त निधी कर्जमाफीसाठी वळविला आहे. यामुळे आदिवासी समाजावर अन्याय आहे. त्यामुळे हे दोन्ही निर्णय त्वरित रद्द करावेत, अशी मागणी पिचड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMadhukar Pichadमधुकर पिचडFarmerशेतकरी